bihar : अबब ! डोंगर फोडून गावकरी झाले रातोरात श्रीमंत !

 

bihar

bihar : बिहार येथे मोठ्या प्रमाणात सोने gold असल्याचे १९८१ मध्ये प्रथम समोर आले. त्यानंतर येथील गावकरी रातोरात श्रीमंत झाले. हे लोक डोंगर खोदून सोने काढायचे आणि विकायचे, असे सांगितले जात होते. त्यामुळे भारत सरकारने १९८२ मध्ये येथे उत्खननावर बंदी घातली. बिहारच्या जमुई जिल्ह्यात jumai jilha चक्क मोठ्या प्रमाणात सोने असल्याचे समोर आले आहे. अशा परिस्थितीत हे सोने बाहेर काढले तर बिहारची भरभराट येईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

 

 

 

अहवालानुसार, जमुई जिल्हा jumai jilha मुख्यालयापासून ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘करमतियामध्ये’ संपूर्ण देशाच्या एकूण सोन्याच्या साठ्यापैकी ४४ टक्के सोन्याचा साठा आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाने याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे सोने gold काढण्यास केव्हा सुरुवात होणार याची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे.

 

 

 

 

पायाभूत सुविधांचाही विकास होणार

या सोन्याच्या उत्खननामुळे जमुई जागतिक स्तरावर प्रसिद्ध तर होईलच शिवाय यामुळे स्थानिक लोकांना रोजगारही मिळेल. याशिवाय पायाभूत सुविधांचाही विकासही होईल. २०२२ मध्ये केंद्रीय खाण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण पथकाच्या तपासणी अहवालानंतर सरकारी पातळीवर ही माहिती सार्वजनिक केली होती. यानंतर बिहार सरकारच्या तत्कालीन खाण मंत्र्यांनीही बिहार विधानसभा आणि परिषदेत ही माहिती दिली होती.