bhakti mahamarg : सिंदखेडराजा-शेगाव भक्ती महामार्ग bhakti mahamarg रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी ६ ऑगस्ट रोजी तालुक्यातील करतवाडी, घानमोड- मानमोड शिवारातील ‘टॉवरवर’ चढून आंदोलन करीत या महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला.तालुक्यातील करतवाडी, घानमोड- मानमोड परिसरात असलेल्या उंच टॉवरवर महामार्गाने बाधित सुमारे पंचवीस तरुण महामार्गविरोधी घोषणा देत टॉवरवर चढले होते.
टॉवरखाली परिसरातील शेकडो महामार्ग बाधित शेतकरी जमा झाले. या महामार्गास प्रारंभीपासूनच विरोध आहे. याअनुषंगाने महामार्ग mahamarg विरोधी कृती समिती व बाधित शेतकऱ्यांनी सातत्याने आंदोलने चालविली आहेत. तर सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षाच्या आमदारांनीही अधिवेशनात महामार्ग रद्द करण्याची मागणी करूनही सरकारकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहेत.
गेल्या पाच महिन्यांपासून आंदोलने सुरू असतानाही सरकार शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत नसेल आणि आमच्या जिवापेक्षा प्रिय जमीन आमच्या पासून हिसकावून घेतली जात असेल तर जगायचे तरी कशासाठी? असा सवाल आंदोलनकर्ते करीत आहेत. या आंदोलनात प्रदीप जाधव, समाधान म्हस्के, सागर अंभोरे, सतीश म्हस्के, मदन दायजे, अक्षय वाघ, गजानन म्हस्के, रमेश म्हळसणे, मनोहर म्हळसणे, विठ्ठल मापारी, सुरेश पिंगळे, गजानन धांडगे, मोहन म्हळसणे, मधुकर सपकाल गजानन म्हस्के सनील आंभोरे, शिवशंकर म्हस्के, विष्णू सपकाळ, शालीक तायडे, कुमारदास म्हळसणे, पवन सपकाळ, बंडू तायडे, वंदना सपकाळ, गोकुळा आंभोरे, प्रमिला म्हळसणे, कमल सपकाळ, मंदा दायजे, शिवा सपकाळ आदी सहभागी झाले होते.
आंदोलन तात्पुरते स्थगित
या लक्षवेधी आंदोलनानेही जर सरकारचे आणि प्रशासनाचे डोळे उघडणार नसतील तर यापेक्षा आक्रमक आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला. दरम्यान याबाबत माहिती मिळताच आंदोलनस्थळी पोहचून निवासी नायब तहसीलदार वीर यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रशासनाला आंदोलनाची माहिती देऊन महामार्ग रद्द करण्यासाठी प्रयत्न करु, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. यावेळी महामार्ग कृती समितीचे निमंत्रक डॉ. सत्येंद्र भुसारी, डॉ. ज्योती खेडेकर, देविदास कणखर, शिवनारायण म्हस्के, प्रा. नरेंद्र खेडेकर, अशोकराव पडघान, किसन धोंडगे, बिदुसिंग इंगळे आदी सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व पदाधिकऱ्यांनीही आंदोलकांची समजूत काढली व जीवघेणे आंदोलन करण्यापासून परावृत्त केले.