मेरा बु. |२४ मार्च २०२६
बायगाव बु. येथे १८ मार्च रोजी झालेल्या धक्कादायक दरोडा प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत लाखो रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला असून, सध्या तीन आरोपी फरार असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. गावकऱ्यांनी तत्परता दाखवत एका आरोपीस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले, ही या प्रकरणातील महत्त्वाची बाब ठरली आहे.
दत्तू विष्णू खरात (वय ६४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रात्री घराबाहेर झोपले असताना चार अज्ञात इसम तोंड बांधून आले आणि चाकूचा धाक दाखवत घरातील महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यात सोन्याची एकदानी, मंगळसूत्र, कुडके, नथ, मोरणी तसेच चांदीचे दागिने आणि नगदी असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज लुटण्यात आला.
इतकेच नव्हे तर, भारत भगवान ताकतोडे यांच्या मुलावर चाकूने वार करून त्याला जखमी करण्यात आले. तसेच त्यांच्या कुटुंबातील महिलांच्या अंगावरील दागिनेही जबरदस्तीने काढून घेतले. शिवनारायण ताकतोडे यांच्या कुटुंबालाही चाकूचा धाक दाखवत सोन्याचे दागिने हिसकावण्यात आले.
या गंभीर प्रकरणी पोलिसांनी रवी प्रदीप पवार (रा. मोठेगाव, जि. वाशिम), इलेश जगन शिंदे (रा. धानोरा), उमेश जगन शिंदे (रा. धानोरा, बुलढाणा) आणि अजय प्यारेलाल पवार (रा. पेनटाकळी) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र, यातील तीन आरोपी अद्याप फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकाबंदी करत आरोपींचा शोध सुरू केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेची पथके देखील तपासात सहभागी झाली असून, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
📢 Related News
- धक्कादायक! राजेगावमध्ये शेतातून 1.43 लाखांचे पाळीव प्राणी चोरी; शेतकऱ्यांमध्ये भीती
- बुलढाण्यात बोगस प्रमाणपत्र घोटाळा; १५ कर्मचारी निलंबित
- शिवजयंती मिरवणुकीतील राडा; आरोपींना कोर्ट कोठडी
📢 Call To Action
अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि वेगवान बातम्यांसाठी Kattanews.in ला दररोज भेट द्या. आपल्या परिसरातील बातमी आम्हाला पाठवण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा.











