Aurangabad news| गाडी हळू चालवण्यास सांगितल्याने आई-वडील समोरच युवकाचा चाकु भोसकून खून.

Aurangabad news
Aurangabad news

 

 

Aurangabad news : छत्रपती संभाजी नगर शहरामध्ये रसुसाट जाणाऱ्या नशेखोरांच्या गाडीचा धक्का लागल्यानंतर त्यांना गाडी हळू चालवण्यास सांगणाऱ्या निष्पाप तरुणाची निघृण हत्या करण्यात आली. अमान सय्यद असद (१८), असे मृताचे नाव आहे. हसूलच्या जहांगीर कॉलनीत शुक्रवारी रात्री १२ वाजता ही धक्कादायक घटना घडली. विशेष म्हणजे, नशेखोरीच्या आहारी गेलेल्या टवाळखोरांनी अमानच्या आई- वडिलांसमोर त्याच्या छातीत बरगड्यापर्यंत चाकू खुपसून त्याची हत्या केली.

 

अमान जहांगीर कॉलनीत कुटुंबासह राहत होता. त्याचे वडील सय्यद असद सय्यद रशीद यांचा भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. एक भाऊ, दोन बहिणींमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा असलेला अमान वडिलांना व्यवसायात मदत करत होता. २१ जून रोजी रात्री १० वाजता अमान मित्र अरबाज शेखसह परिसरातील एका किराणा दुकानासमोर उभा होता.

 

तेथून अरुंद रस्त्यावर शेख शारेक शेख अन्वर व शेख पप्प शेख अजीज हे दोन टवाळखोर सुसाट दुचाकी पळवत होते. अमानला दुचाकीचा जोराचा धक्का लागला. त्यामुळे अमानने त्यांना ‘गाडी हळू चालवता येत नाही का’ असे विचारून सुनावले. त्यावरून त्यांच्यात शिविगाळ होऊन वाद थांबला.