aurangabad news | आईच्या प्रियकरानेच केले अल्पवयीन मुलीला गरोदर

aurangabad news
aurangabad news

 

 

 

aurangabad news : १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला आठ महिन्यांची गर्भवती करणाऱ्या नराधमाच्या एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा अंकुश जाधव नराधम पीडितेच्या आईचा प्रियकरच निघाला. आईनेच तिला त्याच्याशी संग करण्यास बाध्य केल्याचे समोर आल्याने वाळूज महानगरात खळबळ उडाली आहे. वाळूज परिसरातील निशा (१४, नाव बदलले) हिच्या पोटात दुखत असल्याने तीन दिवसांपूर्वी तिची आई रजनी (नाव बदलले) हिने तिला शासकीय रुग्णालयात नेले.

 

मुलगी आठ महिन्यांची गरोदर असल्याचे डॉक्टरांनी  aurangabad news एमआयडीसी वाळूज पोलिसांना कळविले. आठ महिन्यांपूर्वी एका तरुणाने धाक दाखवून अत्याचार केल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले होते. मात्र मलीची आईने तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने पोलिसही चकित झाले होते.बदनामीच्या भीतीने सुनयना यांनी तक्रार देण्यास नकार दिल्याचे पोलिसांना वाटले.

 

मात्र पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी गुप्त पद्धतीने या गंभीर प्रकरणाचा तपास सुरू ठेवला व धागेदोरे हाती लागताच पोलिसांनी संशयित अंकुश प्रल्हाद जाधव (३९, रा. रांजणगाव) यास ताब्यात घेतले. सुरुवातीला अंकुशने उडवाउडवीची उत्तरे देऊन दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र कसून चौकशी केल्यानंतर त्याने सुनयना ही आपली प्रेयसी असल्याचे सांगत आईशी संबंध प्रस्थापित करीत असताना निकितावरही अत्याचार केल्याची कबुली दिली. यामुळे निशा गर्भवती झाल्याचे अंकुशने कबूल केले. अंकुश घाणेगाव शिवारातील फाइन पॅकेजिंग या कंपनीचा कामगार आहे.