nagpur news | महिलांसमोर मारहाण केल्यामुळे पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या.

nagpur news
nagpur news

 

 

nagpur news : महिलांसमोर मारहाण केल्यामुळे पोलिस कॉन्स्टेबलची आत्महत्या.लग्नासाठी गावात गेल्यानंतर तेथे काही जणांनी मारहाण केल्यामुळे नैराश्यात गेलेल्या एका पोलिस कॉन्स्टेबलने विष प्राशन करत आत्महत्या केली. कॉन्स्टेबलच्या सुसाइड नोटमधून ही बाब समोर आली. हुडकेश्वर पोलिसात आरोपींविरोधात आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.

 

सुनील सुखदेव सार्वे (५६, पिपळा फाटा, हुडकेश्वर मार्ग) असे मृत कॉन्स्टेबलचे नाव असून ते मुळचे गुंथारा (जि. भंडारा) nagpur news येथील होते. ते २६ मे रोजी पत्नी व बहिणीसह लग्नासाठी गुंथारा येथे गेले होते. तेथून परतल्यानंतर ते ड्युटीवरही गेले व त्यांनी विष घेतले होते. उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला.

 

त्यांच्या खिशात दिसलेल्या चिठ्ठीमध्ये आत्महत्येचे कारण नमूद होते.गावामध्ये गेल्यावर त्यांना भोजराज सार्वे, शेषराव सार्वे, नीलेश सार्वे, धनराज सार्वे, भूषण सार्वे यांनी मारहाण केली होती. एका महिला नातेवाइकासमोर मारहाण झाली. त्या मनस्तापात आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे त्यांनी लिहिले.