नात्याला काळिमा ! जन्मदात्यानेच केला आपल्या १० वर्षीय मुलीवर अत्याचार…जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याने पुन्हा एकदा समाजमन सुन्न झाले. अकोला akola जिल्ह्यात घडली आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील दहा वर्षांच्या चिमुरडीवर वडिलांच्या नात्यातील एका वीस वर्षीय युवकाने अत्याचार केला.
याप्रकरणी युवक अटकेत असतानाच आता पोलिस तपासादरम्यान त्या चिमुरडीवर जन्मदात्या बापानेही दारू पिऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. पोलिसांनी त्या ‘नराधम बापाला’ बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीचे आई-वडील नातेवाइकांकडे आले होते. अल्पवयीन मुलीला त्यांच्याकडे ठेवून दोघे बाहेर गेले. यावेळी मुलीच्या वडिलांचा नातेवाईक असलेला यश युवराज गवई याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. पोलिसांनी त्याला अटक करून चौकशी सुरू केल्यावर जन्मदात्या बापानेही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे स्पष्ट झाले.