पुरुषोत्तम बोर्डे / बुलढाणा/प्रतिनिधि.
Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील तडसिवणीचे भूमिपुत्र सिद्धार्थ खरात यांनी सहसचिव गृहविभाग मंत्रालय मुंबई येथुन आपली ३० वर्ष प्रशासकीय सेवा पूर्ण करून दि.१जुलै २०२४रोजी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली आहे. त्यामुळें बुलढाणा येथिल गोवर्धन सभागृह बुलढाणा अर्बन समोर कारंजा चौक येथे दि.२७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता सिद्धार्थ खरात यांनी पार पडलेल्या कर्तव्य निष्ठेचा सेवा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाणा अर्बन बँकेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक उर्फ भाईजी राहणार आहेत तर प्रमुख अतिथी म्हणून पुरुषोत्तम खेडेकर, सेवा निवृत्त कार्यकारी अभियंता इंजि. डी. टि.शिपणे, प्रा.डॉ. सदानंद देशमुख, सेवा निवृत्त उपजिल्हाधिकारी सुनील शेळके, दिनेश गीते, डॉ. नरेश बोडखे आदींची उपस्थिती राहणार आहे. सिद्धार्थ खरात यांनीमहाराष्ट्र शासन मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम, ग्राम विकास विभाग , आरोग्य विभाग , उच्च व तंत्र शिक्षण व गृह विभागात सिद्धार्थ खरात यांनी काम केले.
या व्यतिरिक्त गृह, तुरूंग, उत्पादन शुल्क , शालेय शिक्षण , महसूल , पणन, कामगार , पशुसंवर्धन , दुग्ध , मत्स्यव्यवसाय , जलसंधारण , रोजगार हमी योजना , उर्जा व बंदरे इत्यादी विभागाच्या मंत्रीमहोदयांकडे विशेष कार्य अधिकारी / खाजगी सचिव म्हणून काम केले आहे .मंत्री आस्थापनेवर विशेष कार्य अधिकारी व खाजगी सचिव सारख्या महत्वाच्या पदावर सर्वाधिक काळ काम करणा-या अपवादात्मक अधिका-यांपैकी ते एक आहेत त्या मुळे या कार्यक्रमाला सहकुटुंब सहपरिवार उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार राजेंद्र काळे, पुरुषोत्तम बोर्डे, ॲड. जयसिंग राजे देशमुख, रविंद्र साळवे,प्रविण गीते, सुनील सपकाळ, सोहम घाध्र यांनी केले आहे.