हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

भोकरदन नगरपरिषदेत सत्ता संघर्ष टोकाला! उपाध्यक्ष पदासाठी रस्सीखेच, घोडेबाजार सुरू?

On: December 31, 2025 8:30 AM
Follow Us:
भोकरदन नगरपरिषद उपाध्यक्ष पदासाठी सत्ता संघर्ष
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

भोकरदन | तालुका प्रतिनिधी : संजीव पाटील

भोकरदन नगरपरिषद निवडणूक निकाल नुकतेच जाहीर झाले असून त्यानंतर शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या समरीन मिर्झा बेग यांनी विजय मिळवला आहे.
नगराध्यक्षांसह नऊ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निवडून आले आहेत.

दुसरीकडे भाजपाचेही नऊ नगरसेवक निवडून आले असून काँग्रेसचे दोन नगरसेवक स्वतंत्रपणे विजयी झाले आहेत.
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची संख्या समान असल्याने
भोकरदन नगरपरिषदेत सत्ता संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी स्वतंत्र निवडणूक लढवली असल्यामुळे
काँग्रेसच्या पाठिंब्याशिवाय उपाध्यक्ष पद मिळणे अशक्य मानले जात आहे.
त्यामुळे उपाध्यक्ष पदासाठी घोडेबाजार होणार असल्याची चर्चा
भोकरदन शहरातील नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे.

दरम्यान, स्वीकृत नगरसेवक पदासाठीही कार्यकर्त्यांनी आतापासूनच हालचाली सुरू केल्या आहेत.
भाजपाचे इच्छुक कार्यकर्ते आमदार संतोष दानवे यांच्याशी संपर्क साधत आहेत,
तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते
माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती आहे.

हे पण वाचा..

मराठी अभिनेत्री हेमलता पाटकर दीड कोटी खंडणी प्रकरणात रंगेहाथ पकडली

उपाध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या नगरसेवकांना मोठे महत्व प्राप्त झाले असून
उपाध्यक्ष काँग्रेसचा होतो की काही राजकीय चमत्कार घडतो,
हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे.
या संपूर्ण सत्ता नाट्यावर पुढील आठ दिवसांत निर्णय होणार असून
भोकरदन शहरातील नागरिकांसह सर्वांचे लक्ष या घडामोडीकडे लागून आहे.

हे पण वाचा..

सोन्याचे बिस्कीट दाखवून ज्येष्ठ महिलेची ३२ हजारांची फसवणूक.


👉 महाराष्ट्रातील राजकारणाच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी
Kattanews.in – महाराष्ट्रातील नंबर एक वेगवान न्यूज वेबसाईट फॉलो करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment