Buldhana news : संपत्तीच्या मोहापाई पोटच्या लेकानेच केली वडिलांची हत्या.

Buldhana news

 

 

Kattanews network – Buldhana news  : संपत्तीच्या मोहापायी पोटच्या लेकानेच केली वडिलांची हृदय दावक घटना .  सविस्तर वृत्त असे की वान नदीपात्रात पाच दिवसांपूर्वी कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता त्या मृतदेहाचे मृतदेहाचे आता गुडगूढ उलगडले गेले आहे. संपत्तीचा हिस्सा नावावर करून देत नसल्याच्या वादातून मुलाने त्याच्या मित्रासह वडिलांची हत्या केल्याचे उघड झाल्याने जामोद येथील रहिवासी दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली.

 

 

मृतकाचे नाव अशोक विष्णू मिसाळ (५०) असून, अकोल्यातील तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील ते रहिवासी होते.संग्रामपूरातील कोलद गावालगत वाननदी पात्रातील एका खड्ड्यात अनोळखी मृतदेह १६ जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आढळून आला होता. तामगाव पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवून पाचव्या दिवशी रविवारी या प्रकरणाचे रहस्य उलगडले.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार मृत अशोक मिसाळ १३ जुलै रोजी दानापूर येथे घरात झोपेत असताना, रात्री मुलगा व त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

 

पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह दानापूर येथून दुचाकीने वान नदी पात्रातील एका खड्यात रेती मिश्रीत दगडांनी बुजवून न ठेवला. तिसऱ्या दिवशी १६ जुलै रोजी मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. पोलिसांनी तपास करीत दोघांना अटक केली आहे.याप्रकरणी रविवारी रात्री उशिरा तामगाव पोलिस ठाण्यात कलम १०३ (१), २३८ भा. न्या. संहितानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.