crime : ३ वर्षीय मुलीवर अत्याचार ; ठाणे न्यायालयाचा निर्णय !

crime

crime : तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या संतोष मारुती मोरे santosh maruti more (४५, रा. दिवा, ठाणे) याला पाच वर्षे सश्रम कारावास तसेच दहा हजारांच्या दंडाची शिक्षा ठाणे न्यायालयाने सुनावली. दंड न भरल्यास सहा महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा आरोपीला भोगावी लागणार असल्याचे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. मुंब्रा परिसरातील पीडित मुलगी आरोपी संतोष मोरे santosh more याच्या घरात १७ सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता खेळत होती.

 

 

 

 

त्याच दरम्यान आरोपीने तिच्यावर ‘लैंगिक अत्याचार’ केल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मुंब्रा पोलिस ठाण्यात बलात्कारासह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमाखाली १८ १८ सप्टेंब सप्टेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास अधिकारी पोलिस निरीक्षक माधुरी जाधव यांच्या पथकाने ९ ऑक्टोबर२०२२ रोजी संतोषला अटक केली होती. या खटल्याची सुनावणी ठाण्याचे जिल्हा न्यायाधीश दिनेश देशमुख dinesh deshmukh यांच्या न्यायालयात २० जुलै २०२४ रोजी झाली. सरकारी अभियोक्ता संध्या म्हात्रे यांनी आरोपीला शिक्षा होण्यासाठी जोरदार बाजू मांडून सर्व साक्षी पुरावे सादर केले. आरोपीला पोक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पोलिस हवालदार विद्यासागर कोळी vidyasagar koli यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.