हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मलकापूरमध्ये भीषण अपघात! चारचाकी झाडावर आदळली, ३ युवक ठार; २ गंभीर जखमी

On: December 23, 2025 6:04 AM
Follow Us:
मलकापूर अपघात धरणगाव-धुपेश्वर रोडवर चारचाकी झाडावर आदळली

मलकापूर /प्रवीण गरुडे 

मलकापूर अपघात ही बातमी शहरासाठी हादरवून टाकणारी ठरली आहे. धरणगाव-धुपेश्वर रोडवर घडलेल्या या मलकापूर अपघातात चारचाकी गाडी झाडावर आदळल्याने तीन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. मलकापूर अपघात शनिवारी (२१ डिसेंबर) दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास धरणगाव नजीक घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातील पाच युवक मारुती अर्टीका (क्रमांक MH 12 JC 7508) या चारचाकी वाहनाने धुपेश्वरकडे जात होते. धरणगाव-धुपेश्वर रोडवर चालकाचे वाहनावरील नियंत्रण अचानक सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. अपघात इतका भीषण होता की गाडीचा पुढील भाग पूर्णतः चुरगळला गेला.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या अपघातात रूद्र उमेश पवार (वय १९, रा. सावजी फैल), विनायक जनार्धन अत्तरकार (वय २०, रा. लक्ष्मीनगर) आणि गणेश दीपक इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत राजू वनारे आणि तक्ष धुरंधर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मलकापूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहरातून नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली. शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने मलकापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

एकीकडे मलकापूर नगरपरिषद निवडणूक निकालाची चर्चा सुरू असतानाच घडलेल्या या अपघातामुळे शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 


👉 अशाच ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी KattaNews.in वाचत रहा

मलकापूर, बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मोठी अपडेट सर्वात आधी.


🔗 हे पण वाचा….

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment