हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दरोडा नव्हे तर नवरी पलायनाचा थरार! रिसोड–मोप रस्त्यावर अपहरणाचा मोठा कट उघड

On: December 16, 2025 6:15 AM
Follow Us:
रिसोड–मोप रस्त्यावर अपहरण आणि दरोडा प्रकरणाचा तपास करताना वाशिम पोलिस
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

रिसोड | प्रतिनिधी: विजय जुंजारे 

रिसोड–मोप रस्त्यावर घडलेली दरोड्याची घटना प्रत्यक्षात नवरी पलायन संशयातून घडलेले अपहरण प्रकरण असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. रिसोड–मोप रस्त्यावर दरोडा आणि मारहाणीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र तपासात हा रिसोड अपहरण प्रकार नवरी पलायनाशी थेट संबंधित असल्याचे स्पष्ट झाले असून, वाशिम पोलिसांच्या जलद कारवाईमुळे काही तासांत संपूर्ण कट उघडकीस आला.

नांदेड येथील एक कुटुंब उपचारासाठी जात असताना मोप गावाजवळ तीन चारचाकी वाहनांनी त्यांची स्विफ्ट डिझायर कार अडवली. आरोपींनी प्रवाशांना बेदम मारहाण करून त्यांच्याकडील २२ हजार रुपये लुटले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या आदेशानुसार रिसोड पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा व वाशिम नियंत्रण कक्षाने तातडीने तपास सुरू केला.

तपासादरम्यान आरोपींनी मोहजा (ता. रिसोड) येथील घरात घुसून नवरी मुलगी न मिळाल्याने तोडफोड केल्याचे उघड झाले. तसेच वरपक्षातील दीपक खानझोडे यांना फोन करून, “मुलगी परत दे, अन्यथा अपहरण केलेल्या सीताराम खानझोडे यांना जिवंत ठेवणार नाही,” अशी धमकी देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी अहिल्यानगर, संभाजीनगर व जालना जिल्ह्यांत संयुक्त शोधमोहीम राबवली. अखेर अपहरण करण्यात आलेले सीताराम खानझोडे यांना अहिल्यानगर येथून सुखरूप मुक्त करण्यात आले.

या प्रकरणात राहुल दिलीप म्हस्के, सतिष विनायक जाधव यांना अहिल्यानगर येथून अटक करण्यात आली असून आकाश छगन गायकवाड याला जालना येथून ताब्यात घेण्यात आले आहे. नवरी मुलगी व विवाहाचा मध्यस्थ शांताराम खराटे यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार १० डिसेंबर २०२५ रोजी दीपक खानझोडे यांचा विवाह राधा तुपे हिच्याशी झाला होता. लग्नासाठी दोन लाख रुपयांचा व्यवहार झाला असून नवरी पळून जाण्याच्या तयारीत असल्यामुळे हा संपूर्ण थरार घडल्याचे स्पष्ट झाले.

या प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेतील दरोडा, अपहरण, मारहाण, धमकी व तोडफोडीच्या गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोउपनि. शिवचरण डोंगरे करत आहेत.


👉 वाचकांसाठी आवाहन

अशाच थरारक, सत्य आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी KattaNews.in ला नियमित भेट द्या आणि आमचा WhatsApp / Google Discover फॉलो करा.


📰 हे पण वाचा..

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment