दुसरबीड, दि. १२ (प्रतिनिधी)
ताडशिवणी येथील शेतकरी रामकिसन विश्वनाथ शितोळे (वय ५४) यांनी आज १२ नोव्हेंबर रोजी
सकाळी अंदाजे ५ वाजता राहेरी बुद्रूक शिवारातील त्यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली.
शितोळे यांच्या नावे राहेरी बुद्रूक शिवारात शेतीजमीन आहे. मात्र त्यांनी नेमक्या कोणत्या कारणाने आत्महत्येचे टोक
गाठले याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच किनगावराजा पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी
पाठविण्यात आला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास सुरू आहे.
Related News
- Buldhana च्या खामगावात तहसीलदारांचा अमानवी सल्ला : ‘आत्ताच मरा, मी पेट्रोल आणतो’ — महाराष्ट्र हादरला!
- Soyabean Rate Today in Buldhana | बुलढाणा जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजार भाव.
विश्वासार्ह अपडेट्ससाठी Follow करा!
“महाराष्ट्रातील नंबर 1 विश्वसनीय डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म — Kattanews.in वर दररोजच्या अपडेट्ससाठी Follow करा!”










