हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

खामगावात चाललं काय? महिला संचालिकेचे अपहरण; काँग्रेसच्या दोन नेत्यांवर थेट आरोप!

On: November 14, 2025 6:37 AM
Follow Us:

खामगाव/प्रतिनिधी 

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सत्तासंघर्षात आज एक धक्कादायक वळण आलं आहे. महिला संचालिका वैषाली मुजुमले यांचे त्यांच्या राहत्या घरातून अपहरण झाल्याची सनसनाटी घटना समोर आली आहे. या प्रकरणात काँग्रेस नेते ज्ञानेश्वर पाटील आणि स्वप्निल ठाकरे यांच्यावर थेट किडनॅपिंगचे आरोप करण्यात आले आहेत.

संचालिका मुजुमले यांचे पती यांनी पोलिसात तक्रार दाखल करत संताप व्यक्त केला आहे. “माझ्या पत्नीला शेगाव येथील ज्ञानेश्वर पाटील यांच्या घरी डांबून ठेवण्यात आले आहे, तिला तातडीने मुक्त करा!” असा टाहो त्यांनी दिला. या घटनेमुळे संपूर्ण खामगाव आणि शेगाव तालुका राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पोलीस विभागही अलर्ट झाला असून अप्पर पोलीस अधीक्षकांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले आहे. महिला संचालिकेची सुटका करण्यासाठी पोलीस पथक शेगावच्या दिशेने रवाना झाले आहे. राजकारणातील वर्चस्वाच्या संघर्षामुळे महिला संचालिकेच्या अपहरणापर्यंत मामला पोहोचल्याने बाजार समितीचे वातावरण तापले आहे.

हे पण वाचा.

खामगावात तहसीलदारांचा अमानवी सल्ला : ‘आत्ताच मरा, मी पेट्रोल आणतो’ — महाराष्ट्र हादरला!

या प्रकरणामुळे काँग्रेस नेत्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विरोधकांनी यावर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. खामगाव राजकारणातील या धक्कादायक घडामोडीने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

महाराष्ट्रातील नंबर 1 विश्वसनीय डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्म — Katta News वर दररोजच्या अपडेट्ससाठी Follow करा!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

Leave a Comment