हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

रिसोड नगरपरिषदेत गोंधळात-गोंधळ! महायुतीचा निर्णय लांबणीवर, उमेदवारांमध्ये तणाव वाढला.

On: November 12, 2025 8:09 AM
Follow Us:
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन

जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरू पाटील 

रिसोड नगरपरिषद निवडणुकीत गोंधळात-गोंधळ सुरू असून महायुतीचा निर्णय अजूनही लांबणीवर पडला आहे. निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर रिसोड नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा उमेदवार ठरविण्याची प्रक्रिया रखडली आहे. इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये तणाव वाढला असून स्थानिक राजकारणात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुसरीकडे महाविकास आघाडीने आपला उमेदवार निश्चित केला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे बाळासाहेब देशमुख हे नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार ठरले आहेत.

या निर्णयानंतर आघाडीचा आत्मविश्वास वाढला आहे. महायुतीमध्ये मात्र उमेदवारावर एकमत होत नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्यांकडून वारंवार चर्चा होत असली तरी अद्याप निर्णय घेतला गेलेला नाही.

रिसोड नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर असून मतदान ०२ डिसेंबरला होणार आहे. निकाल ०३ डिसेंबरला लागणार आहे. निवडणुकीचा कालावधी कमी असल्याने प्रचार आणि संघटनात्मक तयारीसाठी फारसा वेळ मिळालेला नाही. त्यामुळे सर्व प्रमुख पक्षांनी गुपचूप प्रचार मोहिमा सुरू केल्या आहेत.

महायुतीची निर्णायक बैठक रविवारी होणार होती, मात्र ती पुढे ढकलून सोमवारी घेण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या बैठकीत महायुती अंतिम निर्णय घेणार की स्वबळावर लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही पक्षांतर्गत मतभेद आणि नगराध्यक्षपदाच्या आकांक्षेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम वाढला आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार गोंधळात सापडले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), उद्धव सेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीचे नवे समीकरण तयार केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे माजी जिल्हा परिषद सभापती व विधानसभा सहसंपर्कप्रमुख विश्वनाथराव सानप यांनी सांगितले की, बाळासाहेब देशमुख यांच्या रूपाने आघाडीचा उमेदवार निश्चित झाला असून स्थानिक जनतेचा पाठिंबा त्यांना मिळत आहे.

महायुतीचा निर्णय विलंबित झाल्यामुळे काही उमेदवार निराश आहेत तर काहींनी आपला प्रचार स्वतंत्रपणे सुरू केला आहे. स्थानिक स्तरावर काही नेत्यांनी स्वबळावर लढण्याचा पर्यायही विचारात घेतला आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात तणाव निर्माण झाला आहे. रिसोड नगरपरिषद निवडणुकीतील ही परिस्थिती आगामी काही दिवसांत अधिक स्पष्ट होईल.

राजकीय निरीक्षकांच्या मते, महायुतीचा निर्णय अधिक उशिरा घेतला गेला तर महाविकास आघाडीला सुरुवातीचा फायदा होऊ शकतो. आघाडीचा उमेदवार बाळासाहेब देशमुख सध्या “सेफ झोन” मध्ये असल्याचे दिसते. महायुतीत अंतर्गत मतभेद कायम राहिले, तर रिसोड नगरपरिषद निवडणुकीच्या निकालांवर त्याचा थेट परिणाम होईल.

हे पण वाचा.

रिसोड नगराध्यक्ष कोण? जनतेत चर्चांना उधाण; मतदारांचा कल कामक्षम नेतृत्वाकडे.

रिसोड नगर परिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज — २९,९६२ मतदारांसाठी ३५ मतदान केंद्रांची तयारी

रिसोड शहरात निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून कार्यकर्त्यांनी गुपचूप प्रचार मोहीम सुरू केली आहे. महायुतीचा निर्णय अजूनही अंधारात असल्याने गोंधळ वाढला आहे. राजकीय नेते आणि मतदार दोघेही आगामी निर्णयाकडे उत्सुकतेने पाहत आहेत.

👉 रिसोड नगरपरिषद निवडणुकीतील प्रत्येक अपडेटसाठी KattaNews.in वर राहा!

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मलकापूर पांगरा येथे ट्रॅक्टर अपघातात युवकाचा मृत्यू

मलकापूर पांगरा येथे भीषण अपघात! धावत्या ट्रॅक्टरवरून तोल जाऊन युवक चाकाखाली; मदत मिळण्याआधीच मृत्यू?

सिंदखेडराजा येथे प्रशिक्षणादरम्यान उपाशी राहिलेल्या आशा सेविकांचे आंदोलन

सिंदखेडराजात प्रशासनाचा गोंधळ! प्रशिक्षणात शेकडो आशा सेविका उपाशी; एक सेविका बेशुद्ध पडून हात फ्रॅक्चर

मोताळा येथे क्रेन ऑपरेटरचा संशयास्पद मृत्यू, हातावर लिहिलेला शेवटचा संदेश

मोताळ्यात हृदयद्रावक घटना! क्रेन ऑपरेटरने घेतला टोकाचा निर्णय; हातावर लिहिलेला शेवटचा संदेश वाचून धक्का

Buldhana district gram panchayat by election 59 villages voting on 28 April 2026

बुलढाणा जिल्ह्यात 59 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणुका जाहीर; 28 एप्रिलला मतदान, 17 मार्चपासून आचारसंहिता लागू

Mehkar Nagar Parishad court notice over construction despite ban order

मनाई हुकूम असतानाही बांधकाम; मेहकर नगरपालिकेचे मुख्याधिकारी व ठाणेदारांना कोर्टाची नोटीस

Maharashtra government decision to sell kerosene at petrol pumps due to LPG gas shortage

गॅस टंचाईमुळे मोठा निर्णय! आता पेट्रोल पंपांवर ‘केरोसीन’ मिळणार; विधानसभेत छगन भुजबळांची घोषणा

Leave a Comment