हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

इन्स्टाग्रामवरून पैसे दुप्पट करण्याचे आमिष! युवकाची ५० हजारांची फसवणूक; मलकापूरात तिघे अटकेत

On: November 7, 2025 3:37 PM
Follow Us:
मलकापूर दुचाकी डिक्की चोरी – साडेचार लाख रुपये चोरी

मलकापूर/प्रतिनिधी

मलकापूर : इन्स्टाग्राम Fraud, Online Scam आणि सोशल मीडियावर पैसे दुप्पट करण्याचे आमिष असे प्रकार सतत वाढत आहेत. अशाच एका Instagram Fraud मध्ये मलकापूर येथे मध्य प्रदेशातील युवकाची ५० हजार रुपये लुबाडण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

इन्स्टाग्राम Fraud च्या माध्यमातून युवकाला ‘एक लाख दिल्यास पाच लाख मिळतील’ असे आमिष दाखवण्यात आले. Online Scam प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली असून इन्स्टाग्राम Fraud प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील अजितसिंग बलदेवशरणसिंग करोरिया (२४) यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, फिर्यादी इन्स्टाग्रामवर रिल्स पाहत असताना एक व्यक्ती त्याच्या संपर्कात आला. त्याने ‘एक लाख रुपये दिल्यास पाच लाख रुपये परत मिळतील’ असे सांगत पैसे दुप्पट करण्याचा दावा केला.

५ नोव्हेंबर रोजी फिर्यादीला मलकापूर येथे बोलावण्यात आले. तेथे आरोपींनी त्याच्याकडून ५०,००० रुपये घेतले तसेच लूटमार करण्याचाही प्रयत्न केला. यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.

हे पण वाचा.

देऊळगाव राजात तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा; पोलिसांची धडक कारवाई, सात युवक अटकेत.

या प्रकरणी शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ७२६/२०२५, ३१८(४), ६२, ३(५) नुसार चार जणांवर गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक दीपक वारे करीत आहेत.

⚠️ सोशल मीडिया वापरताना सावधान!
पैसे दुप्पट, गुंतवणूक, बक्षीस, ऑनलाइन कमाई या नावाखाली चालणारी फसवणूक वाढत आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांचे आवाहन आहे.

📌 अधिक अपडेट्ससाठी Kattanews.in Follow करा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

सिंदखेड राजा गरुड मूर्ती पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या ताब्यात देताना विजय सोनुने आणि इतर

सिंदखेड राजा येथील गरुड मूर्ती अखेर सापडली; महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभागाच्या स्वाधीन

देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयाची इमारत, प्रिया कदम मृत्यू प्रकरण

पोलीस भरतीची तयारी, भविष्यासाठी स्वप्नं…गारखेड्यातील २० वर्षीय प्रिया कदम यांचा देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात मृत्यू; नेमकं कारण काय?

समृद्धी महामार्ग हॉटेल आग - दुसरबीड येथील रमावि हॉटेलमधून निघणारा धूर

समृद्धी महामार्गावर हॉटेलला दुसरबीडजवळ रमावि हॉटेलमध्ये अचानक आग; शॉर्टसर्किटमुळे धुराचे लोट, सुरक्षा बल-क्युआरव्ही पथक धावले

Leave a Comment