सुधीर ढगे/मानोरा प्रतिनिधी
तळप सर्कल मध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत अरुण राठोड यांची नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सेवानिवृत्त ग्राम महसूल अधिकारी म्हणून ओळख असलेले अरुण राठोड हे शेतकरीवर्गात आणि स्थानिक नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून तळप सर्कलमध्ये उमेदवारी मिळण्याची शक्यता जवळजवळ निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
गाव-खंड्यापर्यंत लोकांमध्ये संपर्क, शेतकऱ्यांना दिलेले मार्गदर्शन आणि केलेल्या कामांमुळे अरुण राठोड यांचे नाव तळप सर्कल मध्ये आधीपासूनच मजबूत मानलं जातं.
सावरगाव येथील रहिवासी आणि मूळ गाव बोरव्हा असलेल्या राठोड यांनी संपूर्ण नोकरी काळात मानोरा तालुक्यात काम करताना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत केली.
त्यांच्या प्रामाणिक कामाचा ठसा आजही नागरिकांच्या मनात आहे. तहसीलदारांसोबत समन्वय साधून शेतकरी विषयक प्रश्न मार्गी लावले आणि जमीन सर्वे, पीकहानी पंचनामे, कागदपत्रीय प्रक्रिया आदींमध्ये लोकांना तातडीने मदत केली.
शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान महत्वाचे आहे. मानोरा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी JS Public School ची स्थापना करण्यात पुढाकार घेतला.
याचबरोबर शेतकरी स्वतःचा उत्पादनकर्ता व्हावा म्हणून “श्री अरुण भाऊ राठोड शेतकरी उत्पादक कंपनी” ची उभारणी केली.
या कंपनीमुळे अनेक शेतकऱ्यांना थेट बाजारपेठेपर्यंत पोहोच मिळाली.
राजकीय क्षेत्रात राठोड यांची पकड देखील दांडगी आहे. ते एकेकाळी तत्कालीन आमदार स्व. प्रकाशदादा डहाके यांचे खंदे समर्थक होते आणि तेव्हापासूनच त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मजबूत संबंध राहिला आहे.
त्यांची पत्नी सौ. कविता राठोड या मानोरा तालुक्यात राष्ट्रवादी महिला गटाच्या तालुका अध्यक्षा आहेत.
हे पण वाचा.
आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत तळप सर्कल मधून राठोड यांच्या उमेदवारीची चर्चा जोर धरत असून, स्थानिक पातळीवर त्यांना मोठा लोकसमर्थन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
“शेतकरी, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांसाठी काम करणारा प्रतिनिधी हवा” अशी भूमिका अनेक ग्रामस्थांकडून पुढे येत आहे.










