हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

मेहकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत अनियमितता – चौकशीसाठी बैठक

On: October 26, 2025 8:45 PM
Follow Us:

मेहकर/प्रतिनिधी

मेहकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांमध्ये गंभीर अनियमितता समोर आली आहे. वॉर्ड क्रमांक १५ मधील मतदार यादीत अनेक मृत व्यक्तींची नावे अजूनही कायम असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले आहे. याचबरोबर काही विवाहित महिलांची नावे देखील अजून वगळण्यात आलेली नाहीत.

नागरिकांनी या प्रकाराबाबत तहसीलदारांकडे लेखी हरकती दाखल केल्या असून, प्रशासनाने चौकशीसाठी तातडीची बैठक बोलावली आहे. आता या चौकशीतून नेमकं काय निष्पन्न होतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागरिकांचा संताप आणि तक्रारींचा पाऊस

या प्रकरणात मेहकर येथील काही नागरिकांनी स्पष्टपणे आरोप केला की, अनेक वर्षांपूर्वी निधन झालेल्या व्यक्तींची नावे आजही मतदार यादीत दिसत आहेत. इतकंच नव्हे तर, लग्न होऊन इतर गावात स्थायिक झालेल्या महिलांची नावेही हटवली गेलेली नाहीत. “आमचं नाव काढलं, पण मृतांचं ठेवलं” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

प्रशासनाची चौकशीसाठी तातडीची बैठक

या प्रकरणाची दखल घेत मेहकरचे तहसीलदार निलेश मडके यांनी संबंधित बीएलओंना तात्काळ बोलावलं आहे. सोमवारी विशेष बैठक घेऊन मतदार यादीतील त्रुटींची तपासणी करण्यात येणार आहे. या चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित बीएलओंवर कारवाई केली जाऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे.

निवडणुकीपूर्वी मतदार याद्यांतील गोंधळ गंभीर चिंता

मेहकर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या त्रुटी समोर येणे म्हणजे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं राहणं आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मतदार याद्यांचे पुनर्परीक्षण करून तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली आहे. आता तहसीलदारांच्या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

वडगाव तेजन रॉबरी: सरस्वती विद्यालय परिसरात महिलेची सोन्याची पोत ओरबाडली

शाळेच्या परिसरातच महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याची पोत ओरबाडली; वडगाव तेजनमध्ये दिवसाढवळ्या रॉबरी

जिल्हा परिषद शाळा शिक्षक मोबाइलवर ऑनलाइन पोर्टलची माहिती भरताना

जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी कमी, पण ऑनलाइन उपक्रमांचा भडीमार! ६८ कामांच्या यादीने शिक्षकांची दमछाक; मुलांना शिकवायला वेळ कधी मिळणार?

जळगाव जामोद विद्यार्थिनी मृत्यू घटनेनंतर रामनगर परिसरात शोककळा

दहावीच्या वर्गातून आयुष्याच्या वाटेवर जाण्याआधीच जयश्रीचा प्रवास थांबला; अवघ्या १५व्या वर्षी मृत्यू, ‘नेमकं काय घडलं?’

राहुल बोंद्रे भाजपप्रवेश जाहीर करताना चिखलीचे माजी आमदार

चिखलीच्या राजकारणात ‘नवी वाट, नवा अध्याय’; काँग्रेसला रामराम ठोकत राहुल बोंद्रे यांचा भाजपप्रवेश निश्चित, २२ सप्टेंबरला मुंबईत होणार पक्षप्रवेश

सिंदखेड राजा रुग्णालय श्रेणीवर्धन: १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयासाठी जागेचा प्रश्न कायम

सिंदखेड राजा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन अडीच वर्षांपासून कागदावरच! जागेचा प्रश्न कायम; आडगाव राजात जागा देण्याची मागणी

माँ कमळजा माता मंदिर परिसरात साचलेले पाणी, लोणार

मंदिरात वारंवार पाणी शिरतेय, भाविक संतप्त; माँ कमळजा माता मंदिराच्या संरक्षणासाठी लोणारमध्ये आज चक्का जाम

Leave a Comment