kopargaon : पैशाचा पाऊस पाडणाऱ्याचे अपहरण ; बघा सविस्तर बातमी…

कोपरगाव

kopargaon कोपरगाव kopargaon  तालुक्यात पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून एका इसमाचे अपहरण झाल्याची घटना समोर आल्याने कोपरगावकरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत ‘अपहरण’ झालेल्या व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

फिर्यादी महिला ज्योती इंगळे joyti ingle  इंदिरानगर (मूळ रा. मेहकर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. माझा पती पैशाचा पाऊस पाडण्याचे काम करतो, असे फिर्यादी ज्योती यांनी म्हटले आहे. २२ जून रोजी रात्री कोकमठाण कोंथं (ता. कोपरगाव) जवळ अमोल जयसिंग रजपूतसह इतर चार ते पाच (रा.जानेफळ) व फिर्यादीचा पती दिलीप भिकाजी इंगळे dilip bhikaji ingle पैशाचा पाऊस पाडण्यासाठी आले. यातील आरोपींनी पैशाचा पाऊस पाडण्याच्या कारणावरून पती दिलीप इंगळे यांचे अपहरण केल्याची फिर्याद मेहकर पोलिस स्टेशनला दिली.