bhushi dam : एकाच कुटुंबातील ५ जण भुशी धरणात ; क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं बघा काय घडलं !

Lonawala bhushi dam

bhushi dam : लोणावळा येथील भुशी धरणाच्या lonawala bhushi dam मागील बाजूला असलेल्या धबधब्याच्या प्रवाहात एकाच कुटुंबातील चार मुले व एक महिला असे पाचजण वाहून गेले. रविवारी दुपारी ही दुर्घटना घडली. दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. उर्वरित दोघांचा शोध सुरू आहे. नूर शाहिस्ता अन्सारी (३५), अमिना आदिल अन्सारी (१३), मारिया अन्सारी (७), हुमेदा अन्सारी (६), अदनान अन्सारी (४, सर्व रा. हडपसर, पुणे) अशी वाहन गेलेल्यांची नावे आहेत.

 

 

 

पुण्यातील हडपसर येथील सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या ‘अन्सारी कुटुंबात’ चार दिवसांपूर्वीच एक विवाह झाला होता. त्यामुळे या नवदाम्पत्यासह घरातील नातेवाईक लोणावळा येथे रविवारी फिरण्यासाठी आले होते. १७ सीटर गाडी करून हे कुटुंब लोणावळा येथे गेले होते. भुशी डॅम परिसरातील एका डोंगरात असणाऱ्या एका धबधब्यात हे कुटुंब उतरलं होतं. आणि क्षणार्धात होत्याच नव्हतं झालं .

 

 

 

अन् नातेवाइकांच्या डोळ्यांदेखत वाहून गेले

■ अन्सारी परिवारातील १५ जण वर्षाविहारासाठी आले होते. धरणाच्या पूर्वेकडील प्रवाहात मुले खेळत होती.

■ पावसाचा जोर जास्त असल्याने प्रवाहातील पाण्याचा वेग वाढत होता. मुलांना त्याचा अंदाज आला नाही.

■ मुले प्रवाहात वाहून गेली. त्यांना वाचविण्याचा प्रयत्न करताना नूर अन्सारी याही वाहून गेल्या. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना वाचविणे      इतरांना शक्य झाले नाही.