(गंगाधर बोरकर -kattanews network) – Amravati crime news : वहिनी गर्भवती असल्याने तिच्या मदतीकरिता उत्तर प्रदेशातून अमरावतीत Amravati भावाकडे आलेल्या एका अल्पवयीन मुलीवर परिचयातील २२ वर्षीय आरोपी तरुणाने बलात्कार केला. २५ जून रोजी मध्यरात्री २ ते २:३० च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी सिराजोद्दीन अब्दुल सत्तार (२२, रा. धरमपूर, बलरामपूर, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध बलात्कार व पोक्सोअन्वये गुन्हा दाखल केला. पीडिता ही तिच्या भाऊ, वहिनीसह राहत होती.
आरोपी तिच्या भावासोबत पीओपीचे काम करीत असल्याने तिच्या परिचयाचा होता. घरकाम झाल्यावर २५ जून रोजी ती नेहमीप्रमाणे झोपी गेली असता मध्यरात्रीनंतर दोन ते अडीचच्या सुमारास ‘आरोपी सिरोजोद्दीन’ हा तिच्या खोलीत आला. खोलीच्या दाराची कडी लावून तो आत आला असता, ती ओरडली. त्यावेळी त्याने तिला थापडांनी मारहाण करून तिच्याच ओढणीने तिचे तोंड बांधले व तिच्यावर शारीरिक जबरदस्ती केली. वाच्यता केल्यास तिचा भाऊ व वहिनीला जिवे मारण्याची धमकी देण्यात आली.
ती दिसत होती चिंतित
घटनेनंतर ती जेवण व काम नीट करीत नव्हती. विमनस्क राहायला लागली. त्यामुळे भाऊ व वहिनीने तिला विश्वासात घेत विचारणा केली. त्यावेळी धाडस करून तिने घडलेला प्रसंग कथन केला. त्यावेळी पीडितेच्या भावाने आरोपीला फोन कॉल केला. मात्र, त्याने येण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर तो अमरावतीतून पळून गेला. त्यानंतर पीडितेने भावासोबत नागपुरी गेट पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली.