Devendra fadanvis vs uddhav thackery latest news : भेटीच्या योगायोगाची चर्चा , पण ठरविणे झालेल्या भेटीची नाही…

Devendra fadanvis & uddhav thackery latest news

Devendra fadanvis vs uddhav thackery latest news : ‘उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस’ हे एकमेकांचे कट्टर विरोधक गुरुवारी विधानभवनात अचानक आमनेसामनेच आले नाहीत, तर लिफ्टमधून दुसऱ्या मजल्यावर एकत्रितपणे गेले. योगायोगाने झालेल्या या भेटीची माध्यमांतून खूप चर्चा रंगली, पण त्याचवेळी झालेल्या दुसऱ्या एका भेटीची मात्र कुठलीही बातमी झाली नाही.

 

 

 

ही दुसरी भेट झाली ती उपमुख्यमंत्री फडणवीस, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले nana patole आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात. जवळपास १५ मिनिटे तिघेच एकत्र होते ते फडणवीस यांच्या दालनात, विधानसभेचे कामकाज लवकरच संपले, ते संपताच वडेट्टीवार, पटोले आणि फडणवीस यांच्यात खाणाखुणा झाल्या, ‘माझ्या दालनात या’ असे फडणवीसांनी या दोघांना खुणावले आणि लगेच ते दोघे फडणवीसांच्या दालनात पोहोचले. आमदारांसाठी निधीची तरतूद करताना सत्तापक्ष आणि विरोधक यांच्यात भेदभाव करू नये, अशी विनंती त्यांनी फडणवीस यांना केली. आपापल्या जिल्ह्यातील विकासकामांबाबतही ते बोलले, अशी माहिती आहे.

 

 

 

चर्चेला ‘लिफ्ट’ lift

उद्धव ठाकरे हे दुसऱ्या मजल्यावरील विधानपरिषद सभागृहात जाण्यासाठी लिफ्टजवळ उभे होते. फडणवीसही तिथे आले. दोघांमध्ये अडीच-तीन मिनिटे चर्चा झाली. तेवढ्यात लिफ्ट आली आणि दोघे एकत्रितच दुसऱ्या मजल्यावर गेले. लिफ्टमध्येही ते एकमेकांशी बोलले. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर म्हणाले की, ही भेट म्हणजे योगायोग होता, त्याकडे राजकारणाच्या चष्यातून पाहू नये.

 

 

 

एकीकडे भेट तर दुसरीकडे कानगोष्टी

विधानभवनच्या पायरीवर माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि शिंदेसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांच्यातही बराचवेळ कानगोष्टी सुरू होत्या. एकूणच सत्तापक्ष आणि विरोधक यांच्यात प्रचंड ताणतणाव या अधिवेशनात राहील, असे म्हटले जात असताना कुठे योगायोग तर कुठे ठरवून गुजगोष्टी झाल्या.