गॅसकटरने SBI ATM कापून, २४ लाख लंपास.

State Bank ATM
SBI ATM

 

 

जालना शहरातील भरवस्तीत असलेल्या महावीर चौकातील एसबीआयच्या एटीएम SBI ATM मशिनला गॅसकटरने कापून आतील तब्बल २४ लाख ५४ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सोमवारी पहाटे २ ते २:३० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी धावले, परंतु बँकेचे अधिकारी, कर्मचारी दुपारी ११:३० नंतर घटनास्थळी दाखल झाले.

 

 

जालना jalna शहरातील महावीर चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम SBI ATM मशिन आहे. ते एटीएम मशिन बुधवारी पहाटे २ ते २:३० वाजण्याच्या सुमारास कारमधून आलेल्या चोरट्यांनी गॅसकटरच्या साहाय्याने फोडले आणि आतील २४ ताख ५४ हजार ३०० रुपयांची रोकड चोरून नेली. ही घटना पहाटे पोलिसांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोनि. पंकज जाधव, पोउपनि, भगवान नरोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

 

 

चोरट्यांनी रोख रकमेसह एटीएम SBI ATM मशिनमधील सीसीटीव्हीचे  डीव्हीआरही पळवून नेले आहे. या प्रकरणात कैलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून सदर बाजार पोलिस ठाण्यात कलम गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि. भगवान नरोडे हे करीत आहेत. दरम्यान, मध्यरात्री घटना घडलेली असताना बँकेचे अधिकारी, कर्मचारी दुपारी ११:३० नंतर घटनास्थळी दाखल झाल्याने, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह नागरिकांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

 

दोन पथकाकडून SBI ATM चोरट्यांचा माग

 

 

जालना शहरातील भर चौकातील एटीएम मशिन फोडून २४ लाख ५४ हजारांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याने पोलिसांसमोर आव्हान उभा झाले आहे.त्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा व सदर बाजार पोलिसांची दोन पथके काम करीत आहेत.

 

 

SBI ATM मशीन रामभरोसे

 

 

• जालना शहरात यापूर्वीही विविध एटीएम मशिनमध्ये चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु संबंधित बँकांचे अधिकारी या घटनांना गांभीयनि घेत नसल्याचे चित्र आहे.अनेक एटीएम मशिनसाठी सुरक्षारक्षक नाहीत. सुरक्षारक्षकच नसल्याने एटीएम मशिनमधील रक्कम चोरी करण्याचे धाडस चोरटे करीत आहेत.