मुंबई /प्रतिनिधी
माजी राज्यमंत्री व अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आले. बाबा सिद्दिकी यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आलेली होती.वांद्रे पूर्वमधील खेरवाडीत सिद्दिकी यांचा मुलगा आ. झिशान यांच्या कार्यालयाबाहेर काही जण फटाके फोडत होते. तेव्हा सिद्दिकींवर गोळीबार केला.गोळीबारात बाबा सिद्दीकी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तत्काळ लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.
हल्ल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एक उत्तर प्रदेश आणि दुसरा हरयाणाचा आहे.वांद्रे पूर्वेकडील खेरवाडी जंक्शन परिसरात दोन बंदुकींमधून बाबा सिद्दिकी (baba siddique) यांच्यावर सव्वानऊच्या सुमारास चार ते पाच राउंड फायर करण्यात आले. गोळीबार करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिसऱ्याचा पोलिस शोध पोलीस घेत आहेत.बाबा सिद्दीकी तीन तरुणांनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून पळ काढला.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. गोळ्या लागून गंभीर जखमी झालेल्या बाबा सिद्दीकी यांना तातडीने उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. येथे उपचार सुरू असताना बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार का आणि नेमका कोणी केला, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.