प्रतिनिधी/ किशन काळे रिसोड
वाशिम washim जिल्ह्यातील शिरपूर जैन येथे पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीतील वाशिम तालुक्यातील देगाव शिवारात सो विमलबाई ज्ञानेश्वर चौधरी व ज्ञानेश्वर सोनाजी चौधरी यांच्या घरावर आंतरराज्यीय दरोडे टाकणारी टोळी दिनांक 5 8 2024 रोजी सहा आठ च्या मध्यरात्री रात्री एक वाजता दरम्यान दरोडा टाकण्यासाठी घरात शिरले होते विमलबाई ओलांडल्यानंतर त्यांचे तोंड दाबून त्यांचे पती ज्ञानदेव चौधरी यांना मारहाण करून त्यांच्या जवळील अंगावरील सोन्याचे व नगदी १’७४०००/ रुपयाचा ऐवज लुटून नेला होता.
याप्रकरणी पुढील तपास व आरोपींना अटक करण्याकरिता माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम अनुज तारे यांनी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण ठाणेदार शिरपूर यांच्या मार्गदर्शनात त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे .त्यानुसार पुढील निरीक्षक रामेश्वर चव्हाण याने घटनेचा सखोल अभ्यास करून आधुनिक पद्धतीने गोपनीय माहितीनुसार टीम पाठवून आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न असतांनाच. बुलढाणा जिल्ह्यातून सिने स्टाईल पकडल्या गेला आहे.
अनसिंग पोलीस स्टेशन हद्दीतील देगाव येथील टाकलेल्या दरोडा मध्ये फरार असल्या आरोपी लातूर जिल्ह्यामध्ये 15 सप्टेंबर रोजी 2024 खुनाचा आरोपी जेरू पराता भोसले राहणार बाबुळगाव जिल्हा हिंगोली यांना ग्राम पटाळा जिल्हा बुलढाणा येथून गोपनीय माहितीनुसार आणि तांत्रिक पद्धतीने तपास करून आरोपीला दबंग पदतीने आरोपीला पोलीस स्टेशन शिरपूर यांनी ताब्यात घेतले आहे.या घटनेतील मुख्य आरोपीला लातूर पोलिसांनी पथके पाठवून महाराष्ट्र मध्ये शोध घेत होते परंतु सदर आरोपीस मोठ्या सीताफिने मालेगाव तालुक्यातील शिरपूर पोलीस स्टेशन त्याला ताब्यात घेऊन जर बंद करून पुढील तपास साठी पोलीस स्टेशन वाशिम जिल्ह्यातील अनसिंग पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिलेले आहे.
पुढील तपास ठाणेदार अमर चौरे करीत आहे पोलीस अधीक्षक अनुज तारे अप्पर पोलीस अधीक्षक भारत तांगडे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री नवदीप अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पोलीस ठाणेदार श्री रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ताले पोलीस अमलदार समीर पठाण शरद भाऊ कांबळे सरोद्री शिरपूर पोलीस स्टेशन यांनी केले आहे शिरपूरच्या कारवाईबद्दल वाशिम जिल्ह्यातील एसपी अनुज तारे यांनी शिरपूर ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांचे व त्यांच्या टीमचे व पोलीस कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे देगावतील नागरिक शेतकरी याने शिरपूर पोलीस स्टेशन यांचे कौतुक केले असेच आरोपीला पकडण्यात यावे असे मालेगाव तालुक्यातील शिरपूर वाशी यांना वाटत आहे .