
वाशिम जिल्हा प्रतिनिधी /नारायणराव आरू पाटील
वाशिम (washim) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यांमध्ये घोटा, चिखली, हराळ, या गावांमध्ये ALC पिक विमा कंपनीचे सर्वे करणारी टीम एकाच ठिकाणावर बसून शेतकऱ्यांचे नुकसानीचे फॉर्म भरून घेत आहे शेतकऱ्यांना पैशाची मागणी करत आहेत आम्ही तुमचे नुकसान शंभर टक्के टाकतो आम्हाला पैसे द्या. अशी पिक विमा कंपनीचे सर्वे करणाऱ्या टीमची पैशाची मागणी करत आहेत. आधीच शेतकरी संकटात सापडला त्यावर पिक विमा कंपनी शेतकऱ्यांना लुटत आहे.
शेतकऱ्यांना कंपनी सांगते नुकसान झाली तर ७२ तासाच्या तासाच्या आत नुकसानीचे तक्रार द्यायला सांगते तसं नुकसानीचे पंचनामे करायला दोन महिन्याने का येते शेतकऱ्यांच्या बांधावर..? हा ही आता प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडला आहे. जसे कंपनी शेतकऱ्यांना नियम लावते ७२ तासाच्या आत क्लेम करा नुकसानीचा तसं पंचनामे करायला तातडीने कंपनीने का येत नाही शेतकऱ्यांना लुटणाऱ्या पिक विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर प्रशासन कारवाई करेल का ? विमा कंपनी वाले शेतकऱ्याजवळून पैसे घेतांना ची घटना हराळ या गावातील आहे. AIC पिक विमा कंपनी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लुटणाऱ्या कंपनी वर प्रशासनानेच कडक कारवाई करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या रोषाला समोर जावे लागेल- बालाजी मोरे स्वाभिमानी शेतकरी संघटना नेते यांनी इशारा दिला आहे.