washim : पेंशन फायटर अभिजित पाटील यांची विज्यूक्टा कडून अतिदक्षता विभागात स्नेहभेट!

 

washim

 

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील

 

 

washim : महाराष्ट्र राज्यातील ८ लाख कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी ह्यासाठी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता इतरांना न्याय मिळवून देण्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता प्रहार शिक्षक संघटनेचे पुसद तालूका अध्यक्ष अभिजीत रमेश बोरकर पाटील abhijit ramesh borkar patil यांनी वर्धा येथील उपोषणात सक्रिय सहभाग घेतला.उपोषण स्थगितीनंतर डिहायड्रेशन झाल्याने त्यांना पुसद pusad येथील खाजगी दवाखान्यात अतीदक्षता विभागात दाखल केले.

 

 

 

यावेळी त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्याकरीता व भेटण्याकरीता ‘पुसद’ तालूका विदर्भ ज्यूनिअर काॅलेज टिचर असोसिएशन च्या वतीने सचिव प्रा.गजानन जाधव, प्रा.एस.एल. राठोड, प्रा.भास्कर गरड, प्रा. भाऊसाहेब देशमुख, प्रा. निलेश जाधव, प्रा.नितीन मारकड, मुख्याध्यापक संघाचे रमेश चव्हाण यांनी अभिजीत पाटील यांची पुष्पगुच्छ देऊन स्नेहभेट घेतली व तब्येतीबद्दल विचारपूस करून आपल्या धाडसाबद्दल आपले अभिनंदन व आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत हा आत्मविश्वास दिला. या प्रसंगी त्यांचे वडील सेवानिवृत केंद्रप्रमुख रमेश भिकाजी बोरकर उपस्थित होते..सर्व कर्मचारीवर्गात श्री अभिजित पाटील बोरकर यांच्या बद्दल सहानुभूतीची लाट निर्माण झाली असून जुनी पेंशन साठी एवढे मोठे आंदोलन केल्याबद्दल त्यांचे वर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.