buldhana : हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ ; पतीसह ५ जणांवर गुन्हा दाखल !

 

 

buldhana

 

 

buldhana :हुंड्यासाठी विवाहितेचा शारीरिक, मानसिक छळ, चारित्र्यावर संशय घेऊन माहेरवरून १० लाख रुपये आणण्याचा तकादा लावला. तिला व तिच्या मुलीला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी पतीसह सासू-सासरे, नणंद यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. विवाहिता मेघा धनंजय गायकवाड megha dhanjay gaikwad यांनी बुलढाणा शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, त्यांचे लग्न २०२२ मध्ये झालेले आहे. लग्न होण्याच्या काही दिवस आधी विवाहाच्या पत्रिका सर्वत्र वाटल्यानंतर सासरच्यांनी पाच लाखांची मागणी करीत नवऱ्या मुलासाठी सोन्याच्या अंगठीसह आदी वस्तू घेण्यास भाग पाडले. विवाहानंतर फिर्यादी सासरी गेली.

 

 

 

त्यावेळी पती धनंजय वामनराव गायकवाड, सासरे वामनराव रामराव गायकवाड, सासू सत्यभामा वामनराव गायकवाड, नणंदा मंजूषा वामनराव गायकवाड व पल्लवी वामनराव गायकवाड  यांनी तुझ्या बापाने पाच लाख रुपये दिले. ते कमी झाले असून १५ लाख रुपये द्यायला पाहिजे होते, असे म्हणून पाच लाख आणण्यासाठी मानसिक व शारीरिक छळ केला. ‘चारित्र्यावर’ संशय घेत तुझे कोणाशी अफेयर असल्याचे म्हणत छळ करीत होते. नणंद मनीषाने चापटा व बुक्क्यांनी मारहाण केली. पतीने ग्रुप फोटो काढल्याने सासरे, सासू व नणंदांनी बेदम मारहाण करीत पाच लाखांची मागणी केली. यावेळी वडिलांनी सासरच्या मंडळीची समजूत काढली. परत काही दिवसांनी फिर्यादीस तिचे पती धनंजय गायकवाड याने वडिलांच्या घरी येऊन वागवीत नसल्याचे सांगत अपमान केला.

 

 

 

त्याची नुकसानभरपाई म्हणून दहा लाख रुपये द्या, अन्यथा फारकती देईल, असे म्हणून भांडण केले. त्यांची समजूत काढल्यानंतर फिर्यादी माहेरी गेली. त्यावेळी दोन्ही नणंदांनी काही कारण नसताना भांडण करीत मारहाण करून दहा लाखांची मागणी करीत विवाहितेस १६ जून २०२२ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान पती, सासू, सासरे व नणंदांनी माहेरवरून पैसे आणण्यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देत मारहाण करीत जिवे मारण्याची धमकी दिली. मेघा गायकवाड यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी पती धनंजय गायकवाडसह वामनराव गायकवाड, सत्यभामा गायकवाड, मंजूषा गायकवाड व पल्लवी गायकवाडवर भारतीय न्यायसंहिता २०२३ कलम ३२३, ४९८ (अ), ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला.