चिखली /प्रतिनिधी
बुलढाणा (buldhan) जिल्ह्यातील चिखली येथे घरगुती वादातून व तसेच शेतीच्या वादातून ३० सप्टेंबर रोजी चिखली (chikhali) येथील तहसील कार्यालय चौकात पतीने पत्नी व तिचा मावस भाऊ जोरदार कारने धडक दिली. या धडकेमध्ये महिला गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की सविता समाधान सुरडकर रा.चिखली त्यांचा मावस भाऊ केशव भानुदास महाले रा. कव्हळा हल्ली मुक्काम कृष्ण नगर चिखली यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार ते व त्यांची मावस बहीण सविता समाधान सुरडकर ह्या ३० सप्टेंबर च्या रात्री दहा वाजताच्या सुमारास दोघे दुचकीवर घरी जात असताना तहसील कार्यालय चौकात कौटुंबिक व शेतीच्या वादातून आरोपी समाधान सुरडकर यांनी बोलेरो कार मागून जोरात चालवत आणून दोघांना जीवी मारण्याच्या उद्देशातून जबर धडक दिली. या धडकेमध्ये सविता समाधान सुरडकर या गंभीरित्या जखमी झाल्या होत्या.
तेव्हा त्यांना तात्काळ चिखली येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु जबर एवढी धडक होती की त्यांच्या डोक्याला व मेंदूला मार लागला होता त्यामुळे त्यांना संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारादरम्यान सविता सुरडकर यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीसांनी आरोपी समाधान धनसिंग सुरडकर रा.बेराळा विरुद्ध ०७३३/२४ कलम १०९ भारतीय न्याय संहितानुसार १ ऑक्टोबर रोजीच अपघाताचा गुन्हा नोंद केला होता.पुढिल घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मातोंडकर हे करीत आहेत.