राज्यसेवा परीक्षेत कृषी पदांचा समावेश ; तब्बल २५८ पदांची होणार भरती !

राज्यसेवा

राज्यसेवा परीक्षेत कृषी पदांचा समावेश ; तब्बल २५८ पदांची होणार भरती ! ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने’ (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षेत (२०२४) कृषी सेवेच्या पदांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कृषी सेवेतील २५८ पदे ही राज्यसेवेच्या परीक्षेत समाविष्ट झाली आहेत. या निर्णयाने पुण्यात आंदोलनात उतरलेल्या स्पर्धा परीक्षाधारक विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत कृषी सेवेतील २५८ पदांची भरती प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू केले होते.

 

 

 

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm ekanath shinde यांची भेट घेऊन कृषी सेवा गट ‘अ’ व गट ‘ब’ संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावी, अशी विनंती केली होती. मागणी मान्य होत नसल्याने पुण्यात दोन ते तीन दिवस तीव्र स्वरूपाचे आंदोलन पुकारत सरकारचे लक्ष वेधण्यात आले. यानंतर एमपीएससीने नुकतीच बैठक घेत कृषी पदांचा समावेश करण्याचा निर्णय परिपत्रकाद्वारे जाहीर केला. संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबर रोजी होणार आहे. या परीक्षेत आता कृषीच्या पदांचा समावेश झाला आहे.

 

 

कृषी उपसंचालक, गट-अ पदासाठी ४८, तालुका कृषी अधिकारी तथा तंत्र अधिकारी, गट-ब पदासाठी ५३ आणि कृषी अधिकारी, कनिष्ठ व इतर, गट-ब पदाचे १५७ अशा एकूण २५८ पदांचा समावेश आहे. या पदांच्या परीक्षेसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आरक्षण यांचा तपशील एमपीएससीकडून MPSC परिपत्रकात देण्यात आला आहे. खुल्या गटासाठी कमाल वयोमर्यादा ३८, मागासवर्गीय गटासाठी ४३, माजी सैनिक गटासाठी ४३ आणि दिव्यांग गटातील उमेदवारांसाठी ४५ इतकी वयोमर्यादा आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवारदेखील पूर्व परीक्षेसाठी पात्र असतील. परंतु मुख्य परीक्षेच्या प्रवेशाकरिता अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पदवी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक करण्यात आले आहे.

 

 

 

ज्या उमेदवारांनी यापूर्वी अर्ज केलेला नाही, परंतु वे परीक्षेचे निकष पूर्ण करत आहेत, अशा उमेदवारांना नष्णाने अर्ग करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, नव्याने अर्ज करणान् पात्र उमेदवारांना फक्त महाराष्ट्र कृषी सेवेकरिता अर्ज करण बेट्रोल, यापूर्वी अर्न सादर केलेल्या, तसेच शैक्षणिक अर्हतेनुसार कृषी सेवेकरिता देखील पात्र ठरतात, फक्त अशा अहेताप्राप्त उमेदवारांकरिता कुणी सेवेचा उपलब्ळा करून देण्यात येणार आहे. त्याने अर्ज करणान्या उमेदवारांना फक्त अमरावती, छत्रपती संभाजीनगरनागपूर, नाशिक, मुंबई व पुणे जिल्ला केंद्रावरील परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यात येईल परीक्षेच्या दिवशी अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारांना कोणती परीक्षा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक राहील,