वाशीम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरु पाटील
सरकारचे धोरण शेतकऱ्याचे मरण ,वाशिम जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा…. सध्या अवेळी पावसामुळे अस्मानी संकटामुळे पावसाने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकाला साजेसा पाऊस असा पडत असतानाच काढणीच्या वेळेला शेतकऱ्याचे पीक तोंडाशी आले असून पाऊस थैमान घालत आहे.
तरी शासनाने व प्रशासनाने सर्व शेतकऱ्यांना सरसकट ‘पीक विमा’ जाहीर करून त्यांना अतिवृष्टी मुळे झालेले नुकसानाची आर्थिक भरपाई द्यावी ही कृषि पदवीधर युवा संघटनेचे मंगरूळपीर तालुका उपाधक्ष श्री मंगेश पोपळघट mangesh popalghat यांनी केलेली शासन व प्रशासनाकडे आहे भरपूर प्रमाणात असून शेतकऱ्यांना तोंडाशी आलेला घास अवेळी येत असलेल्या पावसामुळे दूर होत चालला आहे. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मनापासून दिलासा दिला तर शेतकरी नक्की सावरल्या जाईल. नाहीतर टोकाचा मार्ग सेव्ह करण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नसेल असे कृषी मित्र मंडळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.