chhatrapati sambhaji nagar :देशभरात रेल्वे रुळावर सिलिंडर, खांब, दगड ठेवून अपघात घडविण्याचे प्रयत्न सुरू असल्याने चिंता व्यक्त होत असताना, अशीच घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. रेल्वे रुळावर ठेवलेले सिमेंटचे ढापे, दगडांमुळे ताशी १०० किमीच्या वेगाने धावणाऱ्या नंदीग्राम एक्सप्रेसचा nandigram express मोठा अपघात होता होता टळला.
ही घटना रविवारी मध्यरात्री एक वाजता लाडगाव-करमाड शिवारात घडली छत्रपती संभाजीनगरहून chhatrapati sambhaji nagar जालन्याच्या दिशेने रवाना झालेली नंदीग्राम एक्स्प्रेस ‘लाडगाव-करमाड’ शिवारातील उड्डाणपुलाखालून रवाना होताना लोको पायलटला रुळावर सिमेंटचे ढापे, दगड ठेवल्याचे दिसले. ताशी १०० किमीचा वेग असल्याने ब्रेक लागेपर्यंत रेल्वेने दगडांना उडविले. दगड ठेवलेल्या जागेपासून जवळपास २०० मीटरवर जाऊन ही रेल्वे थांबली. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.