वाशीम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील
वाशिम (Washim) जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधारे (kolhapuri bandhare) हे सद्यस्थितीत तरी पांढरे हत्ती बनले असून ते पाणी अडवण्यासाठी कितीतरी रुपये शासन व प्रशासन खर्च करते करत आले. परंतु पाहिजे त्या प्रमाणात पाणी अडवल्या जात नाहीत किंवा काही बंधाऱ्याचे गेट सडलेल्या अवस्थेत आहेत ते सुद्धा टाकल्यानंतर संपूर्णतः पाणी लिकेजेस राहते. त्या बंधार्याची पाणी थांबवण्याची क्षमता नाही असे गेट सुद्धा उपलब्ध नाहीत, चांगले गेट पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याने अशा बंधाऱ्याची तोडफोड करून हे बंधारे नदीच्या पात्रातून वेगळे करावे त्यामुळे निदान नदीचे खोलीकरण करण्याच्या सरकारच्या योजनेला अधिक बळ मिळेल.
म्हणजे नदीतील पाण्याचा प्रवाह जास्त जोराने वाढणार असून त्यामध्ये साचलेला गाळ वाहून जाईल व खोलीकरण नैसर्गिकरित्या होईल. कित्येक वर्षापासून असणारे हे कोल्हापुरी बंधारे जुने झाले असून त्या जागी नवीन बॅरेजेस निर्माण करणे ही काळाची गरज पाहता शासनाला-प्रशासनाला शेतकऱ्याप्रती असलेली चिंता दिसत नाही. शेतकरी मात्र दरवर्षी हे बंधारे अडवण्यासाठी संबंधित विभागाकडे याचना करते परंतु प्रशासनही पाहिजे त्या प्रमाणात चांगले गेट नसल्याने तेच ते गेट टाकल्याने पाहीजेत त्या प्रमाणात पाणीसाठा होत नाही.
पैनगंगा नदीवरील मागील वर्षी मसलापेन येथील कोल्हापुरी बंधाऱ्याचे पपाण्याच्या दाबामुळे जशे गेट तुटून पाणी वाया गेले. पाणीसाठा झाला नाही, त्याचप्रमाणे आसेगावपेन येथील कोल्हापुरी बंधाऱ्यासाठी सुद्धा चांगले गेट नसल्याने तेथे पाणीसाठा होत नाही व तेथे नेहमीच गेट टाकतांना जवळपास २० ते २५ फूट पाणी असते त्यामुळे गेट टाकतांना अडथळे निर्माण होतात व पाहिजे तसे गेट बसत नसल्याने ते सर्वत्र लिकेजेस असतात.लिकेजेसमुळे परंतु पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा बरोबर करण्याच्या प्रयत्न केला तर पाणी निघून जाते.
त्यानंतर बंधार्यात पाणी राहत नाही. यासाठी एकदाचा काय तो निर्णय घ्यावा आणि हे बंधारे कायमचे तोडून निष्क्रिय करावे व नव्याने बॅरजेस निर्माण करावे यासाठी शासन व प्रशासनाने शेतकऱ्याप्रती आपले आस्था दाखवावी अशा प्रतिक्रिया बेलखेडा येथील शेतकरी- ज्ञानबा घोडे, पार्डीतिखे-सदाशिव तिखे, हिवरापेन-नारायणराव सरनाईक मा.सरपंच, देऊळगावबंडा- अनिलराव सरनाईक, येथील शेतकऱ्यांनी बोलतांना आपल्या भावना व्यक्त केल्या.