रामदास कहाळे/सिंदखेडराजा प्रतिनिधी
वंचित बहुजन आघाडी ने जाहीर केली ११ विधानसभा उमेदवारांची यादी. वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा मा.प्रकाश आंबेडकर यांनी शनिवार ला पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केली.यावेळी त्यांनी सांगितले की कोणत्याही पक्षाने पाठिंबा मागितला तरीसुद्धा पाठिंबा दिला जाणार नाही. व त्यानंतर त्यांनी ११ विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यातील ११ उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये सिंदखेड राजा मतदार विधानसभा संघासाठी सविताताई मुंडे यांना परत वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी प्रसिद्धी पत्रकारद्वारे जाहीर केली आहे.
मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडी कडुन सविताताई मुंढे यांना संधी मिळाली होती. यामध्ये त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या व त्यांना एकुण ४१,८०० मते मिळाली होती. त्यांना तिसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली होती.यावेळी परत त्यांनी ५ वर्षात खूप मोठा जनसंपर्क तयार केला आहे.
अॅड. आंबेडकर यांनी भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी हे वंचितचे दोन सहयोगी पक्ष असतील अशी माहिती दिली आणि सुनील गायकवाड (भारत आदिवासी पार्टी) हे चोपडा मतदारसंघातून आणि हरीश, उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) हे रामटेकमधून उमेदवार असतील असेही त्यांनी जाहीर केले. आणखी काही पक्ष लवकरच आपल्यासोबत येतील. आपला निवडणूक जाहीरनामा लवकरच जाहीर करू, असेही ते या पत्रकार परिषदेत म्हणाले.
मतदारसंघ आणि वंचित चे उमेदवार
१) रावेर – शमिभा पाटील
२) सिंदखेडराजा – सविता मुंढे
३) वाशिम – मेघा डोंगरे
४) धामणगाव रेल्वे – नीलेश विश्वकर्मा
५) दक्षिण-पश्चिम – विनय भांगे
६) साकोली – डॉ. अविनाश नान्हे
७) दक्षिण नांदेड – फारुख अहमद
८) लोहा – शिवा नारंगले
९) छत्रपती संभाजीनगर पूर्व – विकास दांडगे
१०) शेवगाव – किसन चव्हाण
११) खानापूर – संग्राम माने.