नारायणराव आरु पाटील/वाशिम जिल्हा प्रतिनीधी
श्री संत भगवानबाबा गणेश मंडळ वाशिम (Washim) जिल्ह्यातील चोरद यांच्या वतीने सोमवार (ता.16) रोजी ह.भ.प.संदीप महाराज आळंदीकर यांचे हरिकर्तण राञी 9 वाजल्यापासुन सुरु झाले होते राशञी 10 वाजता संपन्न झाले किर्तण प्रसंगी मृदंगाचार्य ह.भ.प.उध्दव महाराज देशमुख गायनाचार्य उमेश महाराज राठोड़ ह.भ.प.नागेश महाराज भवर ह.भ.प.शिवराम वाघमारे रंजीत महाराज वाघमारे ह.भ.प.ऋषिकेश महाराज गंगावणे ह.भ.प.श्रीधर महाराज जावळे (विनेकरी)यांची साथसंगत लाभली.
याप्रसंगी गावातील महिला पुरुषांची तसेच श्री संत भगवानबाबा गणेश मंडळाचे अध्यक्ष अनंता घुगे उपाध्यक्ष गणेश घुगे सचिव शाम गुठे,मारोतराव घुगे, विलासराव घुगे,परतापराव घुगे हिंदुराव घुगे,सचीन घुगे,संदीप गंगावणे,विजय घुगे, वैभव जावळे,निलेश घुगे विश्वनाथ घुगे हरि घुगे, अभय गंगावणे,अजय घुगे,दत्तप्रभु घुगे,यासह मंडळाचे सर्व सदस्य कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
सुरुवातीला किर्तण रुपी अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अभंग
म्हनुनी शरण जावे! सर्व भावे देवाशी (1)
तुहा उध्दरीन पार!!भवदस्तुर नदीचा (2)
बहु आहे करुणावंत!!!अनंत हे नाम (3)
तुका म्हणे साक्षी आले!!!तरी केले प्रगट(4)
जिवनात भक्ति शिवाय पर्याय नाही भक्ती केल्याने सुखाची प्राप्ती होते.जिवनात संसाररुपी मध्ये सुख मिळने कठीण आहे.सुखाच्या साठी देवाशिवाय पर्याय नसुन या साठी मनोभावे देवाची पुजा करने आणी देवाला शरण जाने गरजेचे आहे.या कलीयुगात मुलगा आई वडिलांचे ऐकत नाही परंतु ह.भ.प.किर्तणकारांचे ऐकतात याचे कारणही तसेच आहे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज मुक्ताबाई संत जनाबाई यांच्या अभंगात खरा परमार्थ आहे.
छञपती शिवाजी महाराजांना आई जिजाबाईंनी शिवरायांना घडवले तसे आजच्या तरुणाला आईंने घडवा यातच खरा परमार्थ आहे.तरुणांनी व्यसन आणी फॅशन यापासुन दुर राहावे यातच खरा परमार्थ आहे.गणपती बाप्पाला शरण जा जिवनात सुख पाहिजे तर वाईट व्यसनापासुन दुर रहा यातच सुख दडलेले आहे.आपल्या आई वडिलांची सेवा करा वडिलधार्यांचा मान ठेवा देवाचे नाम स्मरण करा
संकटावेळी आई वडिल भाऊ बहिन पत्नी मुलगा मुलगी किंवा नातेवाईक येणार नसुन देवच आपल्यासाठी धावुन येतील म्हणुन देवाला शरण जावे असे किर्तणामधुन ह.भ.प.संदीप महाराज घुगे मारसुळ (आळंदी देवाची) यांनी चोरद येथे किर्तणामधुन गावकर्यांना संबोधित केले आहे.परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते उपस्थित मंडळींनी टाळया वाजवुन देवाचे नाम स्मरण करण्यात आले आहे.