हिसई येथील शेतकरी झालेत अस्मानी संकटामुळे त्रस्त.

 

 

नारायण आरु पाटील, वाशिम /प्रतिनिधी 

 

वाशिम (Washim) जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील या वर्षीच्या पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेच आहे त्यातच निसर्गाने हिसई गावावर व परिसरातील शेतकऱ्यांवर आस्मानी संकटाने घाला घातल्याने ही हिसई येथील शेतकऱ्यांच्या शेतात शंकू मध्ये असणाऱ्या गोगलगायीने अक्षरशः धिंगाणा घातला असून हिसई हे संपूर्ण गाव व परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकामध्ये शंकु गोगलगायीने हैदोस घातला आहे.

 

 

त्यामुळे सर्व शेतकरी परेशान असून शंकू मध्ये असलेल्या गोगलगायीने केलेल्या नुकसानीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत शासनाने द्यावी या शंकुमध्ये असलेल्या गोगलगायीच्या थैमानानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने या बाबीच्या तक्रारी मंगरूळपीर कृषी विभागात भरपूर दिल्या असल्याचे समजते ,परंतु कृषी विभागाने दखल घेतली नाही.

 

 

प्रशासनाने असेच केल्याने शेतकऱ्यांचे वारंवार नुकसान होत असून शेतकरी मेटाकुटीस आलेला आहे. जर शासन व प्रशासन यांनी अशा नैसर्गिक बाबीची व अस्मानी संकटाची दखल घेतली नाही तर शेतकरी आत्महत्या शासन व प्रशासन करत आहे असा समज सर्व शेतकऱ्यांत निर्माण होत असून त्याचे निराकरण व्हायला पाहिजेत आणि आर्थिक मदत सुद्धा मिळायला पाहिजे पण तसे होतांना सध्या स्थिती दिसत नाही.

 

 

याबाबत मंगरूळपीर तालुका कृषी अधिकारी व महसूल विभागाचे तलाठी मंडळ अधिकारी तहसीलदार यांनी दखल घ्यावी जर दखल घेतली नाही तर शेतकरी यांच्या आत्महत्येचे प्रमाण ज्या प्रमाणात आहे. त्याचे पुढेही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.शंकूगोगलगाय ग्रस्त शेतकरी राजु जाधव,दिपक जाधव,बाळू जाधव,दिपक साखरे असून याबाबतची माहिती शेतकरी मित्र मंगेश पोपळघट यांनी दिली आहे.