गणेशोत्सवात आरोग्यास घातक गुलाल वापरण्यावर बंदी ; गुलाल वापरल्यास होणार कारवाई !

gulal

 

 

 

गणेशोत्सवात आरोग्यास घातक गुलाल वापरण्यावर बंदी ; गुलाल वापरल्यास होणार कारवाई ! जिल्हाभरात ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत ‘गणेशोत्सव’ साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही व सार्वजनिक गणेशोत्सव शांततेत पार पाडावा, पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकरिता खबरदारी घेणे गरजेचे आहे. रासायनिक गुलालांची विक्री, साठवणूक व वापर करणाऱ्यावर पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ अन्वये बंदी घालणे आवश्यक असल्याचे सांगत पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत एका पत्राद्वारे विनंती केली होती.

 

 

 

याचीदखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव कालावधीत रासायनिक गुलालांचा gulal वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. रासायनिक गुलालाचा वापर केल्याने काही प्रमाणात पर्यावरणाची हानी व मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. गुलालामध्ये वापरण्यात येणारे घटक लेड ऑबसाईड, कॉपर सल्फेट, क्रोमीअम आयोडाईड व अल्युमिनीअम ब्रोमाईटचा वापर मुख्यतः करण्यात येत असल्याने यामुळे डोळ्यांना अॅलर्जी, किडणीला हानी व अस्थायी अंधत्व, ब्रॉन्कीअल अस्थमा, कॅन्सरचे कारण उद्भवू शकते. तसंच या रसायनामुळे माती, पाणी व हवेचे प्रदूषण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गुलालामध्ये वापरण्यात येणारे रसायन व रंग हे जलस्त्रोतांमध्ये मिसळल्यास जलप्रदूषण होण्याची शक्यता असल्याचे सांगत, रासायनिक गुलालाचे उत्पादन, विक्री व साठवणूक व वापर करण्यावर कायमस्वरूपी बंदी घालण्यात आली आहे.

 

 

 

 

नैसर्गिक गुलाल वापरण्याचा पर्याय खुला

रासायनिक गुलालाचा पर्याय म्हणून पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित पर्याय म्हणून नैसर्गिक घटकापासून बनविण्यात येणारा (हर्बल, जैविक घटकापासून तयार करण्यात आलेला) गुलाल वापरण्यास हरकत नसल्याचेदेखील आदेशात नमूद केले आह. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये गुलालाची उधळण करता येणार नाही, जर गुलालाची उधळण करताना कोणी आढळले, तर त्यावर संबंधित पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्थांची स्वतंत्र पथके कडक कारवाई करणार आहे