घरगुती वादातून चिडलेल्या पतीने केला पत्नीच्या डोक्यात कैचीने वार.

 

 

चिखली प्रतिनिधी

 

चिखलीत घरगुती वादातून चिडलेल्या पतीने पत्नीच्या डोक्यात कैचीने वार करून जखमी केल्याची संतापजनक घटना चिखली शहरात घडली. हिनाबी शेख अकील असे जखमी झालेल्या महिलेचे नाव असून.हिनाबी ही मुलगा सना,आदिल,व असन यांना  यांच्या सोबत चिखली शहरातील गांधीनगरमध्ये राहते. पती शेख अकील शेख कदीर व हिनाबी यां दोघांत घरगुती वाद सुरू आहे. पतीच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून हिनाबी यांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

 

 

त्यामुळे पती अधिकच चिडला. तेव्हापासून त्यांच्यात खटके उडू लागले. ५ सप्टेंबरला सकाळी मुलांना शाळेत सोडून हिनाबी घरी परतली. त्याचवेळी आलेला पती शेख अकील याने घरगुती कारणावरून वाद घालत शिवीगाळ करून तिला मारहाण केली. तसेच हातातील थैलीतून लोखंडी कैची काढली. कैची पाहून घाबरलेली हिना बाहेर पळत असतानाच दरवाजाजवळ अडवून पतीने तिच्या डाव्या कानाच्या वर डोक्यात वार केला.

 

 

यात ती जखमी झाली. शेजारी राहणारा चुलतभाऊ शेख शकील शेख मतीन याने धावत येऊन तिला वाचविले. सद्यस्थितीत हिनावर चिखलीतील रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. तिच्या जबाबावरून पोलिसांनी पतीविरुद्ध बीएनएस कलम ११८ (१), ३५१ (२), ३५१ (३), ३५२ नुसार गुन्हे दाखल केले आहे.