talathi bharti : स्पर्धा परीक्षांच्या घोटाळ्यांचा मास्टरमाईंड दत्ता कडूबा नलावडे (२७, रा. भालगाव) हा तब्बल नऊ महिन्यांनंतर एमआयडीसी सिडको पोलिसांच्या हाती लागला आहे. शनिवारी सकाळी मिलकॉर्नर परिसरात निवांत फिरताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. सप्टेंबरमध्ये शहरात तलाठी परीक्षेसह विविध स्पर्धा परीक्षांचे घोटाळे समोर आले. तेव्हापासून दत्ता पोलिसांना गुंगारा देत होता ५ सप्टेंबर रोजी चिकलठाण्यातील परीक्षा केंद्राबाहेर राजू नागरे याला पोलिसांनी रंगेहाथ उत्तरे पुरवताना पकडले.
त्यानंतर यात टीसीएस कंपनीच्याच कर्मचाऱ्यांच्या सहभागातून हा घोटाळा होत असल्याचे तत्कालीन उपायुक्त शीलवंत नांदेडकर यांच्या तपासात निष्पन्न झाले होते. यात पर्यवेक्षक शाहरुख शेख, पवन सिरसाट, बाली हिवराळे व विकी सोनवणे यांना अटक करण्यात आली होती. दत्ता पसार झाला होता.
talathi bharti व नावावर अनेक गुन्हे
शनिवारी एमआयडीसी सिडकोचे अंमलदार प्रकाश सोनवणे, विनोद कानपुरे मिल कॉर्नर भागात असताना त्यांना काही अंतरावर दत्ता दिसला, त्यांनी तत्काळ त्याचा पाठलाग करून मुसक्या आवळून उपनिरीक्षक आत्माराम घुगे यांना ही बाब कळवली.यापूर्वी दत्तावर २०१८, २०१७ मध्ये परीक्षा घोटाळ्यांचे गुन्हे दाखल असल्याचे घुगे यांनी सांगितले.