Abacus | राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत रिसोडच्या विद्यार्थ्यांचे यश.

 

 

नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी

 

वाशिम शहरांमध्ये स्मार्ट किड्स अबॅकस प्रा.ली. कंपनीकडून राज्यस्तरीय अबॅकस (Abacus) स्पर्धेचे आयोजन दि. 25 आगस्ट रोजी चितांमणी हॉल येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये आदर्श अबॅकस अकॅडमी रिसोडच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी याआधी पण अकोला येथील राज्यस्तरीय व पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उल्लेखनीय यश मिळवले होते.

 

 

 

वाशिम येथील स्पर्धेत आदर्श अकॅडमी रिसोड च्या 25 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 18 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले यासाठी कंपनीचे सीईओ श्री. संजय कळमकर सरांनी अकॅडमीच्या संचालिका सौ.माधुरी गजानन व्यवहारे यांना सलग दुसऱ्यांदा बेस्ट फ्रेंचाईसी अवॉर्ड ने सन्मानित केले आहे.या स्पर्धेत विविध गटात प्रथम क्रमांक प्रणित आहेर, आदर्श बोडखे ,साक्षी फुलसावंगे , अनघा देशमुख , आदर्श व्यवहारे ,व्दितीय क्रमांक सिद्धी पवार ,अमृता भोयर ,श्रावणी घोटे ,सोहम पुंड, तर तृतीय क्रमांक मध्ये रुही मेटांगळे ,जय कवर ,श्रावणी राजगुरू , शशांक खराटे , सायना राजगुरू , निधी राठोड यांनी क्रमांक व ट्रॉफी मिळवली.

 

 

 

तर उत्तेजनार्थ बक्षीस मध्ये स्वरा शेंडगे , अर्णव इप्पर ,समर्थ केनवडकर यांचा समावेश आहे. तसेच सांची कांबळे , संस्कृती मोरे , अरहंत सावळे , अनन्या घोटे , स्वरा जाधव , सृष्टी शेवाळे , विश्व वाघ हे विद्यार्थी सहभागी होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्मार्ट किडस अबॅकस कोल्हापुरच्या कु. त्रिशला भोसले , सौ. पुजा पवार व प्रमुख पाहुणे म्हणून सौ. तिलोत्तमा खराटे मॅडम , श्री. रविभाऊ भांदुर्गे उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. गजानन व्यवहारे तर सूत्रसंचालन श्री. दिपक पाचरणे सर यांनी तर आभार सौ. माधुरी व्यवहारे यांनी केले.

 

 

 

कार्यक्रमाला पालकांची उपस्थिती उल्लेखनिय होती. विद्यार्थ्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय पालक व आदर्श अकॅडमी रिसोड च्या संचालिका सौ. माधुरी व्यवहारे यांना दिले. गेली १० वर्षापासून रिसोड येथे त्या अबॅकस क्लास घेतात. हजारो विद्यार्थी त्यांनी घडवले.