pm kisan yojna | या तारखेला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार २ हजार रुपये.

pm kisan yojna
pm kisan yojna

 

 

pm kisan yojna : मंगळवारी पीएम किसान योजनेचा १७वा हप्ता खात्यात जमा होणार पंतप्रधान नरेंद्र मोदी १८ जून रोजी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीला भेट देणार आहेत. यादरम्यान, ते देशभरातील ९.२६ कोटी लाभार्थी शेतकऱ्यांसाठी २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या पीएम-किसान योजनेचा १७वा हप्ता जारी करतील.

 

 

मोदी स्वयंसाहाय्यता गटांच्या ३० हजारहून अधिक सदस्यांना प्रमाणपत्रेदेखील देतील. त्यांना कृषी सखी म्हणून प्रशिक्षण देण्यात आले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कृषी क्षेत्राप्रती सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पीएम किसान हा २०१९ मध्ये सुरू केलेला उपक्रम आहे.