रामदास कहाळे, सिंदखेड राजा/प्रतिनिधी
सिंदखेड राजा तहसीलदार कधी असलेले लाचखोर तहसीलदार सचिन जयस्वाल यांची अवैध्य गौण खनिज प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर सिंदखेडराजा तहसीलदार पदी प्रभारी तहसीलदार म्हणून प्रवीण धानोरकर यांनी कार्यभार स्वीकारला होता परंतु या कालावधीमध्ये अवैध धंदे करण्यासाठी वाव मिळाला होता त्यामुळे त्यांना बऱ्याच तक्रारींचा सामना करावा लागला होता.
महसूल विभाग अंतर्गत निघालेल्या शासन निर्णयामध्ये अजित हनुमंत दिवटे यांची सिंदखेडराजा तहसीलदार पदी नियुक्ती झाली आहे. दिवटे यांनी सिंदखेड राजा तहसीलदार पदाचा कारभार हाती घेतल्यानंतर तालुक्यातील रेती तस्करी थांबणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.