पवन वाळकेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी युरोपमध्ये निवड.

 

नारायणराव आरु पाटिल/प्रतिनिधी 

 

रिसोड येथील समता फाउंडेशन द्वारा संचालित मन्नालाल अग्रवाल स्किल अँड टेक्निकल इन्स्टिट्यूट मध्ये रिसोड तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी तसेच कंकरवाडी येथील संत तुकाराम महाराज विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी आयटी क्षेत्रातील रोबोटिक्स, वेब डेव्हलपमेंट, मशीन लर्निंग व ब्लॉक चेन डेव्हलपमेंट हे कोर्सेस व इतरही अनेक कोर्स शिकवले जातात.

 

 

 

या इन्स्टिट्यूटच्या वतीने दिनांक 10 व 11 ऑगस्ट रोजी पुणे येथे झालेल्या स्पर्धेत इंटरमीडिएट गटात कंकरवाडी येथील संत तुकाराम महाराज विद्यालयातील विद्यार्थी पवन गजानन वाळके वर्ग ९ वी या विद्यार्थ्याने उत्कृष्ट कामगिरी करत लाईन फॉलोवर प्रकारात राष्ट्रीय स्तरावर टॉप १० मध्ये स्थान मिळवले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल पवन वाळके यांची व त्यांच्या टीमची युरोपच्या इस्टोरिया या देशामध्ये ०४ डिसेंबर २०२४ रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

 

 

 

तसेच नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या रोबोटिक स्पर्धेतही उत्तुंग यश त्यांनी मिळवले आहे. समता फाउंडेशन द्वारा आयोजित रोबोटिक स्पर्धेतील हे यश शिक्षण व कौशल विकास क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण टप्पा समजला जात असून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. आज शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण ढेकळे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्याचा व त्याच्या वडिलांचा शाल ,श्रीफळ व शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

 

आपल्या यशाचे श्रेय रोबोटिक क्लास चालू करणारे समता फौंडेशनचे अध्यक्ष मन्नालाल अग्रवाल तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल शैक्षणिक भवितव्यासाठी संत तुकाराम महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण ढेकळे सर रोबोटिक क्लास घेणारे समता फौंडेशनचे मार्गदर्शक तसेच पवनचे वडील गजानन वाळके, शाळेचे प्राचार्य साहेबराव जाधव व शिक्षक यांना देतात.संत तुकाराम महाराज विद्यालय हे ग्रामीण भागातील असून विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव देणारे विद्यालय म्हणून नावारूपास येत आहे.

 

 

 

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बाबारावजी घुगे, कुंडलीकराव देवकर, भगवान देवकर सर,गजानन वाळके, सुनीलभाऊ ढेकळे, आश्विनी घिगे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून तर सर्व शिक्षक वृंद तसेच नारायण कांबळे, दिगंबर महामुने राजू पवार तसेच किसन डवरे हे उपस्थित होते. यावेळी अध्यक्षीय भाषणात ढेकळे सरांनी मुलांना यशाचा मंत्र दिला. यावेळी वाढदिवसानिमित्त घेतलेल्या सर्व स्पर्धातील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. कु. अनघा ढेकळे वर्ग५वी या विद्यार्थ्यांनीचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा चाटसे मॅडम तर आभार प्रदर्शन गजानन सानप यांनी केले.