नारायणराव आरु पाटिल/प्रतिनिधी
रिसोड जवळच असलेल्या मांगवाडी गावात व परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या शेतातील पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून हे नुकसान शेतकऱ्यांना न सोसणारे आहे. या अस्मानी संकटाचा अगोदर शेतकरी सामना करत असतांना बैलांच्या खानमळणीच्या व पोळ्याच्या दिवशीच पोळा सण साजरा करण्याच्या मनस्थितीत असलेला शेतकरी अचानक झालेल्या मुसळधार पावसाने खचून गेला
असून पोळा साजरा करण्याच्या मनस्थितीत नसतानां सुद्धा बैलाचा सण वर्षातून एकदाच येतो, त्यामुळे मनात इच्छाशक्ती नसतांना सुद्धा बैलाला सजूऊन व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पोळा साजरा करावा लागला.मांगवाडी येथील शेतीचे व झालेल्या नुकसानीचा महसूल विभागाने पंचनामा करून आर्थिक मदत मिळण्यासाठी दखल घ्यावी. याबाबत रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांचा दूरध्वनीवरून संपर्क साधला.आणी तसेच रिसोड विधानसभेचे आमदार अमित झनक यांना याबाबत माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत दोघांनीही प्रत्यक्ष मांगवाडी मध्ये येऊन शेतकऱ्याच्या नुकसानीची पाहणी केली तसेच महसूल चे कर्मचारी मंडळ अधिकारी जावळे,तलाठी खंदारे पाहणी करण्यासाठी दाखल झाले.यावेळी गावातील सर्व शेतकरी उपस्थित होते.