
नारायणराव आरु पाटिल/प्रतिनिधी
वाशिम तालुक्यातील अडोळी ,खंडाळा, वांगी, धानोरा, एकबुर्जी, मोहजारोड ,सावरगांव जिरे या परिसरातील शेतशिवारामध्ये दिनांक ३०.३१ आॅगस्ट, १,२ सप्टेंबर या दरम्यान खुप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असुन या भागातील प्रमुख पिक असलेल्या सोयाबिन पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन त्याच बरोबर इतरही पिकाचे नुकसान झाले आहे या वर्षी अत्यंत बहरलेले सोयाबिन पिक होते.
परन्तु हाता तोंडाशी आलेला घास परिसरातील शेतकऱ्यांच्या हातुन निसर्गाने हिरावून घेतला असून सोयाबिन पिक अक्षरशः पावसामुळे आडवे पडले आहे. शेतकऱ्यावर खुप मोठे संकट निर्माण झाले असुन शेतकऱ्यांचे झालेले नुकसान लक्षात घेता प्रशासनाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यया आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.