नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
वाशिम अमरावती महामार्गावर झालेल्या अपघातात दोन सख्खे भाऊ साखरा गावच्या फाट्याजवळ असलेल्या विद्युत उपकेंद्राजवळ हा अपघात झाला असून दोन सख्खे भाऊ एकाच कुटुंबातील होते त्यांचा मृत्यू झाल्याने पार्डी टकमोर गावातील लोकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हे दोघे भाऊ अल्पभूधारक शेतकरी आहेत. पार्डी टकमोर गावातील हे रहिवासी असून गावात येणाऱ्या पोळा सणावर दुःखाची छाया पसरली असून पोळा सणावर विरजण पडले आहे.
मृताची नावे अनिल देवराव खोरणे आणि सुनील देवराव खोरणे हे दुचाकीने वाशिम वरून पार्डी टकमोर येथे आपल्या गावी निघाले होते. दुचाकीला ट्रकने इतकी भीषण धडक दिली की दोघे भाऊ जागेवरच ठार झाले या अपघाताचा तपास वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशन करत आहेत. दोघे भाऊ वाशीमला कामानिमित्त आले होते.अशी सुत्रांनी माहिती आहे.