मलकापूर : कट्टा न्यूज नेटवर्क
मलकापूर शहरातील सुनील टॉकीज परिसरात इस्टेट ब्रोकर राकेश तलरेजा (वय ४५) यांच्यावर अज्ञात दोन व्यक्तींनी ॲसिड फेकून हल्ला केल्याची घटना २१ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. या हल्ल्यात तलरेजा यांच्या चेहऱ्यासह दोन्ही डोळ्यांना आणि शरीराच्या इतर भागांना दुखापत झाली आहे. या घटनेमुळे मलकापूर शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राकेश तलरेजा हे माजी नगरसेवक पप्पूसेठ तलरेजा यांचे पुत्र असून ते इस्टेट ब्रोकर म्हणून परिचित आहेत. ते सिंधी कॉलनी परिसरात राहतात. २१ ऑक्टोबर रोजी देवीच्या विसर्जनानंतर ते सुनील टॉकीजजवळील आपल्या राहत्या अपार्टमेंटमध्ये पोहोचले होते. यावेळी ते फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर ॲसिड फेकले. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर दोन्ही हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले.
या हल्ल्यात तलरेजा यांच्या चेहऱ्याला आणि दोन्ही डोळ्यांना दुखापत झाली. अॅसिडमुळे त्यांच्या छातीसह शरीराच्या इतर भागांनाही इजा झाली असून तोंडातही ॲसिड गेल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. घटनेनंतर जखमी तलरेजा यांना प्रथम डॉ. चेतन जाधव यांच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. चेतन जाधव आणि नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अंकुर संचेती यांनी त्यांची तपासणी करून प्राथमिक उपचार केले.
त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना जालना येथे नेत्ररोगतज्ज्ञांकडे पाठविण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. हल्लेखोरांची ओळख पटलेली नसून पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील अधिक तपशील तपासानंतर समोर येण्याची अपेक्षा आहे.
मलकापूर शहरातील वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
📲 मलकापूर आणि बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या मिळवा!
स्थानिक घडामोडी, क्राइम न्यूज, शेती, शिक्षण आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी KattaNews च्या WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा.
हेही वाचा
- कुटुंबावर दुःखाचा डोंगर! मेहकरमधील ५६ वर्षीय ITI शिक्षकाची आत्महत्या; मेरा बु. येथील शेतात मृतदेह आढळल्याने परिसरात शोककळा
- सैलानी बाबा दर्गा परिसरात अनोळखी महिलेचा मृतदेह; ओळख पटविण्यासाठी रायपूर पोलिसांचे आवाहन
- बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई
KattaNews सोबत जोडलेले राहा!
तुमच्या परिसरातील बातमी, घटना किंवा नागरिकांच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवा. महत्त्वाच्या स्थानिक घडामोडींसाठी KattaNews.in ला भेट देत राहा.













