चिखली : विशाल गवई
बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा दर्गा परिसरात अंदाजे ६५ वर्षे वयाच्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेची अद्याप ओळख पटलेली नसून, तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी रायपूर पोलिसांनी नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
या महिलेच्या जवळ ‘लिलावती मुंडे’ हे नाव नमूद असलेली दवाखान्याची चिठ्ठी आणि एक फोटो मिळून आला आहे. मात्र, या चिठ्ठीवरील नावावरून महिलेची ओळख निश्चित झालेली नाही. त्यामुळे तिच्याबाबत अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
या प्रकरणी रायपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित महिला आपल्या गावातील किंवा परिसरातील असल्याची शक्यता वाटत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधावा. महिलेच्या नातेवाईकांबाबत किंवा ओळख पटविण्यास मदत होईल अशी कोणतीही माहिती असल्यास ती पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास खारडे आणि पोलीस कर्मचारी अझरुद्दीन काझी करीत आहेत.
अनोळखी महिलेची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा :
- पोलीस स्टेशन रायपूर : ०७२६२-२७००३०
- पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास खारडे : ८४२१६१३३८२
- पोलीस कर्मचारी अझरुद्दीन काझी : ९३७०९६१९६२
या महिलेची ओळख पटविण्यासाठी ही माहिती आपल्या मित्रमंडळींना, गावातील नागरिकांना आणि संबंधित परिसरातील लोकांना पाठवा. एखाद्या व्यक्तीपर्यंत ही बातमी पोहोचल्याने महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास मदत होऊ शकते.
बुलढाणा जिल्ह्यातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी KattaNews.in ला भेट देत राहा.
संबंधित बातम्या
- चिखलीहून देऊळगाव राजाकडे येताना काळाचा घाला; उंबरखेड फाट्याजवळ अपघातात २४ वर्षीय वैष्णवी घुगे यांचा मृत्यू
- अवघ्या २६ व्या वर्षी जीवनप्रवास थांबला; चिखलीतील तरुण तलाठी पियुष गायकवाड यांची आत्महत्या
- बुलढाणा जिल्हा परिषदेत ACB ची धडक कारवाई; लाच मागितल्याच्या आरोपावरून तांदूळकर आणि खर्चे या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई










