दूर्धर आजार जडलेल्या रुग्णांच्या अर्थसहाय्यातवाढ करण्याचा निर्णय योग्यच.

 

 

नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी

 

दूर्धर आजार कर्करोग, हृदयरोग, किडनी यासारख्या दुर्धराने आजारी असणाऱ्या, उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी वाशिम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग समीती कडून दिल्या जाणाऱ्या अर्थसाहयात वाढ करण्याच्या निर्णयाप्रत आरोग्य विभाग आला असून या अगोदर प्रत्येकी रुग्णाला १५,०००/- मिळत होते, परंतु अशा रुग्णांचा औषध व गोळ्यांचा खर्च पाहता ५०,०००/- ची तरतूद प्रत्येक रुग्णामागे देण्याचा आरोग्य विषय समीतीचा मानस असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे.

 

 

 

तसा समीतीने निर्णय घेतला असून त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करण्यात येणार आहे.याची तरतूद लवकरच केली जाणार आहे. असे वाशिम जिल्हापरिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती चक्रधर गोटे यांनी बोलतांना सांगितले. विविध कारणामुळे मानवाला विविध प्रकारचे दुर्धर आजार जडत आहेत. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील, दारिद्र्य रेषेखालील गोरगरीब रुग्णांना कर्करोग, किडनीचा विकार यासारख्या दुर्धर आजारावरील उपचाराचा खर्च झेपावणारा नसल्याने जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून तरतूद करुन अशा रुग्णांना पैसे मिळणार आहेत.

 

 

 

यासाठी राज्य शासनाने नमूद केलेल्या रुग्णालयात उपचार घेतला अशाच रुग्णांनी प्रस्ताव सादर केल्यानंतर एक महिन्यात अशा प्रस्तावाची तपासणी होते व पंधरा दिवसानंतर दूर्धर आजार जडलेल्या आणखी प्रस्ताव सादर केलेल्या रोग्याला लाभ दिल्या जातो. अशी माहिती आरोग्य विषय समितीचे सभापती चक्रधर गोटे यांनी अर्थसह्यात वाढ करणार असल्याचा निर्णय घेतला आहे.जिल्हा परिषदेच्या विषय समीती व सदस्यांचा निर्णय अभिनंदनास पात्र आणी लोकोपयोगी निर्णय आहे.या बाबीचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.